सव्वा लाखाची करचोरी उघड; सरकारची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 04:51 AM2018-09-13T04:51:54+5:302018-09-13T04:51:57+5:30

बनावट क्रेडिट नोटच्या साहाय्याने खासगी कंपनीने शासनाची कोट्यवधी रुपयांची करचोरी केल्याचे उघड झाले आहे.

Disclose tax liability; Government fraud | सव्वा लाखाची करचोरी उघड; सरकारची फसवणूक

सव्वा लाखाची करचोरी उघड; सरकारची फसवणूक

Next

नवी मुंबई : बनावट क्रेडिट नोटच्या साहाय्याने खासगी कंपनीने शासनाची कोट्यवधी रुपयांची करचोरी केल्याचे उघड झाले आहे. आयात माल व क्रेडिट नोट यातील तफावत निदर्शनास आल्याने केंद्रीय वस्तू व सेवाकर तथा केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे. त्यानुसार एक लाख १२ हजार ३९६ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आले असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
महापे येथील प्रोटेक इंजिनीअर्स अ‍ॅण्ड फॅब्रिकेशन या कंपनीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीकडून होणाऱ्या मालाच्या आयातीच्या व क्रेडिट नोटच्या व्यवहारावर केंद्रीय वस्तू व सेवाकर तथा उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाची नजर होती.

Web Title: Disclose tax liability; Government fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.