पादचारी महिलेकडे केली शरीरसंबंधाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 04:08 AM2018-04-23T04:08:52+5:302018-04-23T04:08:52+5:30

एपीएमसीतला प्रकार : सार्वजनिक ठिकाणी अनैतिक धंद्यांचा परिणाम

Demonstrate the body's relationship with pedestrians | पादचारी महिलेकडे केली शरीरसंबंधाची मागणी

पादचारी महिलेकडे केली शरीरसंबंधाची मागणी

Next

सूर्यकांत वाघमारे।
नवी मुंबई : विश्रांतीसाठी रस्त्यालगत थांबलेल्या महिलेकडे तिच्या पतीसमक्ष शरीरसंबंधाची मागणी केल्याचा प्रकार एपीएमसीत घडला. शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे वेश्यागमनासाठी आलेला ग्राहक व महिलेच्या पतीमध्ये जोरदार भांडण झाले. उघड्यावर चालणाऱ्या अनैतिक धंद्यांना आवर घालण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने अशा प्रकारांमधून सर्वसामान्य महिलांना बदनामीकारक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरात जागोजागी उघड्यावर वेश्याव्यवसायाचे अड्डे चालवले जात आहेत. पोलिसांच्या कारवाईचा धाक न राहिल्याने यापूर्वी केवळ तुर्भेतील के.के.आर. रोड परिसरात चालणारा वेश्याव्यवसाय संपूर्ण शहरभर पसरला आहे. रेल्वेस्थानक परिसर, सार्वजनिक स्वच्छतागृहे, ट्रक टर्मिनल यासह शहरातील एकांताच्या जागी हे अनैतिक धंदे चालत आहेत. त्यापैकी एपीएमसी आवारातील मॅफ्को मार्केट समोरील चौकालगत चालणाºया अनैतिक धंद्यांवर पोलिसांनी यापूर्वीही अनेकदा कारवाई केली आहे. परिसरातील झोपडपट्टीत राहणाºया अथवा शहराबाहेरून आलेल्या महिला, मुली त्या ठिकाणी दिवस-रात्र वैश्या व्यवसायासाठी उभ्या असतात. तर ग्राहकासोबत बोलणी ठरल्यानंतर परिसरातच आडोशाच्या ठिकाणी अश्लिल कृत्य केले जाते. याचा त्रास त्या ठिकाणावरून जाणाºया सर्वसामान्य महिलांना सहन करावा लागत आहे. शनिवारी रात्री अशाच प्रकारातून गावी चाललेल्या एका महिलेला पतीसमोर बदनामी सहन करावी लागली. रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास हे दाम्पत्य गावी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रतीक्षेत थांबले होते. सानपाडा पुलाखाली तसेच मॅफ्को चौकालगत रात्रीच्या वेळेस खासगी ट्रॅव्हल्स थांबतात. यामुळे हे दाम्पत्य त्या ठिकाणी बस येण्यास अवधी असल्याने रस्त्यालगत बसले होते. याच वेळी तिथे आलेल्या एका मद्यपी व्यक्तीने सदर महिलेकडे वेश्यागमनासाठी दर विचारला. पतीसोबत बसलेली असताना आलेली व्यक्ती आपल्यासोबत असे वक्तव्य करत असल्याने सदर महिला भयभीत झाली. अखेर संतप्त झालेल्या महिलेच्या पतीने त्या व्यक्तीसोबत वाद घातला असता त्यांच्यात हाणामारी होऊन बघ्यांची गर्दी जमली. अखेर प्रत्यक्षदर्शींनी या प्रकाराची माहिती १०० नंबरवर कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी जमावाने पोलिसांनाही धारेवर धरत, तिथे वेश्याव्यवसाय चालत असतानाही कारवाई का करत नाही, याचा जाब विचारला.

शहरातील वाढते अवैध धंदे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहेत. वेश्याव्यवसाय, गांजाविक्री अशा अवैध धंद्यांमुळे रात्री-अपरात्री शहरातील तरुण पिढी वाममार्गाला जाऊ लागली आहे. यामुळे उद्ध्वस्त होत चाललेले शहराचे भवितव्य जपण्यासाठी पोलिसांनी कर्तव्याप्रति प्रामाणिकता दाखवावी. - संतोष जाधव, प्रत्यक्षदर्शी

मॅफ्को मार्केटलगत उघडपणे वेश्याव्यवसाय चालत असतानाही पोलिसांना तो दिसत नाही, याचे आश्चर्य आहे. जोपर्यंत अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी कारवाई होत नाहीत, तोपर्यंत सर्वसामान्य महिलांनाही बदनामीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यांवर कारवाई करून सर्वसामान्य महिलांना सुरक्षेची खात्री पटवून द्यावी.
- योगेश बर्गे, तुर्भे रहिवासी

च्मागील दोन वर्षांत शहरात अनैतिक धंदे वाढले आहेत. अमली पदार्थ विक्री, वेश्याव्यवसाय, देशी दारू विक्री याचे अड्डे ठिकठिकाणी उघडपणे चालत आहेत. या धंद्यांमध्ये शहराबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा समावेश दिसून येत आहे.

Web Title: Demonstrate the body's relationship with pedestrians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा