सीमा शुल्क विभागाने १४ मेट्रिक टन अंमली पदार्थ जाळले; तळोजातील केंद्रातील लावली विल्हेवाट

By नारायण जाधव | Published: February 7, 2024 07:42 PM2024-02-07T19:42:27+5:302024-02-07T20:19:36+5:30

विल्हेवाट लावलेल्या लावलेल्या अमंलीपदार्थांची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे समजते.

Customs department burnt 14 MT of narcotics Planted disposal at the center in Talojah | सीमा शुल्क विभागाने १४ मेट्रिक टन अंमली पदार्थ जाळले; तळोजातील केंद्रातील लावली विल्हेवाट

सीमा शुल्क विभागाने १४ मेट्रिक टन अंमली पदार्थ जाळले; तळोजातील केंद्रातील लावली विल्हेवाट

नवी मुंबई: तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या अत्याधुनिक केंद्रात मुंबईच्या सीमा शुल्क विभागाने बुधवारी सुमारे १४ मेट्रिक टन अंमली पदार्थांची शास्त्रोक्त पद्धतीने जाळून विल्हेवाट लावली. अंमली पदार्थ प्रतिबंधक आयुक्तालय, मुंबई सीमाशुल्क विभाग -३ च्या मुख्य आयुक्त प्राची स्वरुप, आयु्क्त अतुल पांडा आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे अंमलीपदार्थ तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रक्रिया केंद्रात शास्त्रोक्त पद्धतीने जाळून नष्ट केलयाचे सीमा शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. 

विल्हेवाट लावलेल्या लावलेल्या अमंलीपदार्थांची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे समजते. तळोजातील या सेंटरमध्ये यापूर्वी मुंबई पोलिस, नारकोटिक्स ब्युरो यांनी पकडलेल्या कोट्यवधींच्या अंमलीपदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.

Web Title: Customs department burnt 14 MT of narcotics Planted disposal at the center in Talojah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.