जेएनपीटीतील सीआयएसएफमुळे पासधारक त्रस्त, शिपिंग कंपन्यांचे एजंट, सीएचएसच्या कर्मचा-यांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:00 AM2017-10-23T03:00:11+5:302017-10-23T03:00:23+5:30

उरण : जेएनपीटी बंदरातील सीआयएसएफच्या व्हिजिलन्स विभागाच्या कर्मचा-यांकडून दिल्या जाणाºया त्रासामुळे कामगार, व्यापारी, एजंट त्रस्त झाले आहेत.

Concerned by the CISF in JNPT, the agent of the shipping companies, the employees of CHS | जेएनपीटीतील सीआयएसएफमुळे पासधारक त्रस्त, शिपिंग कंपन्यांचे एजंट, सीएचएसच्या कर्मचा-यांचा संताप

जेएनपीटीतील सीआयएसएफमुळे पासधारक त्रस्त, शिपिंग कंपन्यांचे एजंट, सीएचएसच्या कर्मचा-यांचा संताप

googlenewsNext

उरण : जेएनपीटी बंदरातील सीआयएसएफच्या व्हिजिलन्स विभागाच्या कर्मचा-यांकडून दिल्या जाणाºया त्रासामुळे कामगार, व्यापारी, एजंट त्रस्त झाले आहेत. वरिष्ठांच्या नावाखाली सीआयएसएफच्या व्हिजिलन्स विभागाच्या कर्मचाºयांकडून सुरू असलेल्या हप्तेखोरीमुळे त्रस्त झालेल्या कंपन्या, शिपिंग कंपन्यांचे एजंट, सीएचएस यांनी बंदरात कामानिमित्ताने येणे-जाणेच कमी केले आहे. कमांडटच्या नावाने सुरू असलेल्या हप्तेखोर सीआयएसएफ कर्मचाºयांमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जेएनपीटी बंदर आणि बंदरांतर्गत असलेली विविध खासगी बंदराची सुरक्षा सीआयएसएफकडे सोपविण्यात आली आहे. बंदरात येणारी विविध कंपनीची जहाजे आणि त्यावरील क्रू मेंबर, विविध शिपिंग कं पन्यांचे एजंट, बंदरातील चालणाºया कॅ न्टीन आणि इतर कामकाजासाठी कामगार बंदराच्या गेटमधून ये-जा करतात. तसेच कामासाठी आवश्यक लागणारे सामानही घेऊन बंदरात आत-बाहेर करावे लागते. यासाठी सीआयएसएफकडून अधिकृत पासेसही दिले जातात. मात्र, बंदरात प्रवेश करण्यासाठी अधिकृत पासेस असतानाही सीआयएसएफच्या व्हिजिलन्स विभागाच्या कर्मचाºयांकडून त्रास दिला जातो.
जेएनपीटीत सीआयएसएफचे चिफ कमांडो धनंजय नाईक यांच्या नावाने पासधारकांकडून पैसेही उकळले जात असल्याचा आरोप आहे. अनेकदा व्हिजिलन्स विभागाच्या कर्मचारी एन. के. प्रजापती यांच्यासह इतरही कर्मचारी यामध्ये अग्रेसर असून, पैसे उकळल्यानंतरच बंदरात सामान गेटवरून आत-बाहेर सोडण्यात राजी होत असल्याचा आरोप त्रस्त पासधारकांकडून केला जात आहे. याबाबत तक्रार करण्याचीही सोय नाही. कारण, बंदरात काम आणि व्यवसाय करीत असल्याने तक्रार केल्यास त्यांना व्हिजिलन्स विभागाच्या हप्तेखोर कर्मचारी आणि अधिकाºयांकडून अधिक त्रास देण्याची भीती आहे. त्यामुळे याबाबत तक्रार करण्यास कुणी पुढे येत नसल्याचा आरोपही संबंधित पासधारकांकडून केला जात आहे.
सीआयएसएफच्या व्हिजिलन्स विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या नावाखाली उघडपणे सुरू असलेल्या कर्मचाºयांच्या हप्तेखोरीमुळे मात्र बंदरातील पासधारक व्यापारी, कामगार, एजंट पुरते त्रस्त झाले आहेत. याबाबत सीआयएसएफचे मुख्य कमांडो धनंजय नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, व्हिजिलन्स विभागाबाबत काही तक्रार असल्यास दिल्ली कार्यालयात संपर्क साधावा, अशी सूचना त्यांनी केली.

Web Title: Concerned by the CISF in JNPT, the agent of the shipping companies, the employees of CHS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.