खारघरमध्ये सिडकोची सार्वजनिक सायकल योजना अखेर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:05 PM2019-06-16T23:05:39+5:302019-06-16T23:05:55+5:30

सेंट्रल पार्कमध्ये सेवा; शेअरिंग सिस्टीम तत्त्वावर सुरुवात

CIDCO's public cycle plan in Kharghar continues | खारघरमध्ये सिडकोची सार्वजनिक सायकल योजना अखेर सुरू

खारघरमध्ये सिडकोची सार्वजनिक सायकल योजना अखेर सुरू

Next

पनवेल : खारघर शहरात सिडकोच्या माध्यमातून सार्वजनिक सायकल योजना रविवारी सुरू करण्यात आली. सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर तसेच व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या उपस्थितीत सेंट्रल पार्क मध्ये ही सेवा सुरू करण्यात आली. यापूर्वी दोन वेळा व्यवस्थापकीय संचालकांना वेळ मिळत नसल्याने या सेवेचे उद्घाटन रद्द करण्यात आले होते.

संबंधित सायकल योजना ही पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टीम या तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. शहरात याकरिता स्थानके उभारली जाणार आहेत. पुणे आणि बंगळुरूच्या धर्तीवर ही सेवा खारघर शहरात सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेनेही ही सेवा शहरातील नागरिकांसाठी सुरू केली आहे. या सेवेचा विस्तार खारघर शहरापासून नवीन पनवेलपर्यंत करण्यात येणार असल्याचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष ठाकूर यांनी सांगितले.

तसेच व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी, वाहतूककोंडी सोडविण्यासाठी व प्रदूषणावर मात करण्यासाठी सिडकोचे हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे सांगितले. शहरातील सर्वच नागरिकांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे. सिडकोने याकरिता युलू बाइक्सला एक वर्षाची मंजुरी दिली आहे.

उद्घाटनाप्रसंगी प्रभाग ‘अ’चे सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक नरेश ठाकूर, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेविका वनिता पाटील, नगरसेविका आरती नवघरे, ब्रिजेश पटेल, प्रभाकर जोशी, बिना गोगरी, दीपक शिंदे, मंगल कांबळे, सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखेडकर, खारघरचे प्रशासक रमेश गिरी, संजय पुदाळे आदीसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: CIDCO's public cycle plan in Kharghar continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.