अतिक्रमणांच्या विरोधात सिडकोचा धडाका; आठ दिवसांत अनेक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:37 AM2017-11-02T05:37:05+5:302017-11-02T05:37:13+5:30

पावसाळा आणि त्यानंतर आलेल्या सण-उत्सवामुळे शिथिल झालेली अतिक्रमणविरोधी कारवाई सिडकोने पुन्हा तीव्र केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २0१५ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

CIDCO crackdown against encroachment; Crush several illegal constructions in eight days | अतिक्रमणांच्या विरोधात सिडकोचा धडाका; आठ दिवसांत अनेक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

अतिक्रमणांच्या विरोधात सिडकोचा धडाका; आठ दिवसांत अनेक बेकायदा बांधकामे जमीनदोस्त

Next

नवी मुंबई : पावसाळा आणि त्यानंतर आलेल्या सण-उत्सवामुळे शिथिल झालेली अतिक्रमणविरोधी कारवाई सिडकोने पुन्हा तीव्र केली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २0१५ नंतर उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. तसेच दिवसाआड उभारणाºया अतिक्रमणांवरही नियमित कारवाई केली जात आहे. गेल्या आठवडाभरात नवी मुंबई महापालिका क्षेत्रासह दक्षिण नवी मुंबईतील अनेक अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. या महिन्याभरात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे.
बेकायदा बांधकामांचा विषय गंभीर बनला आहे. दिवसाआड उभारल्या जाणाºया बेकायदा बांधकामांचे आव्हान सिडकोसमोर उभे ठाकले आहे. राज्य सरकारने २0१५ पर्यंतच्या बांधकामांना अभय दिले आहे. त्यामुळे नवीन बांधकामे उभारली जाणार नाहीत, यादृष्टीने सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या आठवड्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. उलवे येथील पुनर्वसन आणि पुन:स्थापनेसाठी आरक्षित असलेल्या एका मोठ्या भूखंडावरील बेकायदा कंटेनर यार्ड चार दिवसांपूर्वी जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर कामोठे परिसरातील बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. तत्पूर्वी रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ आणि मोकळ्या जागेवर बस्तान ठोकून असलेल्या फेरीवाल्यांना हुसकावून लावण्यात आले. तर मंगळवारी गोठीवली येथील सुरू असलेल्या एका बांधकामावर हातोडा मारण्यात आला. तसेच यावेळी रबोळे स्थानकाच्या परिसरातील सिडकोच्या मोकळ्या जागेवर उभारलेल्या बेकायदा झोपड्यांवरही कारवाई करण्यात आली. बुधवारी उलवे परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत कोपर-गव्हाण सेक्टर ९ व बामण डोंगरीच्या सेक्टर १८ मधील बेकायदा धार्मिक स्थळांवर कारवाई करण्यात आली.
सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे मुख्य नियंत्रक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थानिकांकडून तीव्र विरोध झाला. परंतु कडेकोट पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) डी.के.जोगी, सहायक नियंत्रक एस.आर.राठोड आदींच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तर उत्तर नवी मुंबईत नियंत्रक पी.बी.राजपूत, सहायक नियंत्रक गणेश झिने यांनी कारवाई मोहीम राबविली. दोन्ही विभागातील या कारवाई मोहिमेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचे भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आले.

सिडकोच्या अनधिकृत नियंत्रण विभागाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. अत्यावश्यक साधनसामग्रीचा अभाव आहे. त्यामुळे कारवाई करताना या विभागासमोर अडचणी निर्माण होत आहेत. असे असले तरी उपलब्ध साधनसामग्रीच्या बळावर या विभागाने अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. येत्या काळात ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. बेकायदा बांधकामाबरोबरच अनधिकृत धार्मिक स्थळे, फेरीवाल्यांचे अतिक्रमण आदीवर कारवाई नियोजित करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बेकायदा बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या महिन्यात ही मोहीम अधिक व्यापक करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. या मोहिमेला बांधकामधारकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसेच नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी बेकायदा इमारतीतील घरे विकत घेवू नयेत, असे आवाहन अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक पी.बी.राजपूत यांनी केले आहे.

Web Title: CIDCO crackdown against encroachment; Crush several illegal constructions in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको