विदेशी तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 06:27 AM2018-09-21T06:27:25+5:302018-09-21T06:27:28+5:30

रेल्वेच्या जनरल डब्यात विदेशी तरुणीचा विनयभंग करणाºया तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे.

The arrest of the foreign woman was molested, crime branch proceedings | विदेशी तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

विदेशी तरुणीचा विनयभंग करणाऱ्याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

Next

नवी मुंबई : रेल्वेच्या जनरल डब्यात विदेशी तरुणीचा विनयभंग करणाºया तरुणाला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. अय्याज कुरेशी (२६) असे त्याचे नाव असून, तो मानखुर्दचा आहे. तक्रारदार तरुणीने मोबाइलने फोटो काढल्याने त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याला कुर्ला रेल्वे स्थानकातून अटक करण्यात आली.
११ सप्टेंबर रोजी वाशी ते मानखुर्द दरम्यान लोकलमध्ये हा प्रकार घडला होता. देवनारच्या टाटा सामाजिक विज्ञान केंद्रात शिक्षण घेण्यासाठी फिनलँड येथून आलेली तरुणी व तिच्या मैत्रिणीसोबत हा प्रकार घडला होता. या दोघींनी वाशी रेल्व ेस्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सकडे जाणारी लोकल पकडली होती; परंतु महिलांच्या डब्याऐवजी घाईमध्ये विदेशी तरुणीने जनरल डब्यात प्रवेश केला होता, त्या वेळी एका तरुणाने तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला होता. या वेळी तिने मोबाइलने त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता, दोघांमध्ये भांडणही झाले; परंतु संपूर्ण प्रकार सुरू असताना तिथे उपस्थित एकाही प्रवाशाने तिच्या मदतीला धाव घेतली नाही, असाच प्रकार वेगळ्या डब्यातून प्रवास करणाºया मणिपूरच्या तिच्या मैत्रिणीसोबतही घडला. या प्रकरणी त्यांनी वरिष्ठांना कळवले असता, वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती.
त्यानुसार रेल्वे पोलीस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार केले होते. त्यांनी विदेशी महिलेने मोबाइलने काढलेल्या फोटोच्या आधारे वाशी ते कुर्ला स्थानकातील सीसीटीव्ही तपासले होते. या वेळी तक्रारदार तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार आणि छायाचित्रानुसार आरोपी कुर्ला स्थानकात वारंवार दिसून आला. या वेळी अय्याजची ओळख पटली.

Web Title: The arrest of the foreign woman was molested, crime branch proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.