महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 02:21 AM2021-02-13T02:21:29+5:302021-02-13T02:21:39+5:30

दत्तक घेतलेल्या पालकांसाठी आर्थिक मदत योजनांचा समावेश

Appeal to avail the schemes of Women and Child Welfare Department | महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे. या योजनांमध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती, खेळाडूंना आर्थिक मदत, तसेच मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना आर्थिक मदत या योजनांचा यामध्ये समावेश आहे.

   यामध्ये शिष्यवृत्ती योजनेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एमबीबीएस विद्यार्थिनीसाठी १ लाख, बीएएमएस विद्यार्थिनीसाठी ५० हजार, बीएचएमएस विद्यार्थिनीसाठी ५० हजार प्रथम वर्ष वगळता प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. दुसरी योजना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक, सांघिक कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंसाठी या योजनेत राज्यस्तरीय वौयक्तिक खेळाडूंसाठी दहा हजार व संघासाठी २५ हजार, तसेच राष्ट्रीय स्तरावर वैयक्तिक खेळाडूंसाठी २५ हजार व संघासाठी ५० हजार रुपये आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे.

    तिसऱ्या योजनेचा लाभ अनाथ व निराधार मुलींचा सांभाळ करणाऱ्या पालकांना घेता येणार आहे. अनाथ मुलींना दत्तक घेणाऱ्या पालकांसाठी प्रोत्सहात्मक रक्कम म्हणून २५ हजारांचे अनुदान पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाने काढलेल्या पत्रकात माहिती दिली आहे. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी हे परिपत्रक काढले आहे.

 महिला व बालकल्याण विभागाच्या या योजना गरजूंसाठी लाभदायक आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी १० मार्चपर्यंत या विभागात अर्ज करण्याचे अवाहन सभापती मोनिका महानवर यांनी केले आहे.

महिला व बालकल्याण 
विभागाच्या या योजना गरजूंसाठी लाभदायक आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी १० मार्चपर्यंत या विभागात अर्ज करण्याचे अवाहन सभापती 
मोनिका महानवर यांनी केले आहे.

Web Title: Appeal to avail the schemes of Women and Child Welfare Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.