रागाच्या भरात पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 02:11 AM2017-10-03T02:11:11+5:302017-10-03T02:11:20+5:30

पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहणाºया जितेंद्र राठोड (३०) याने किरकोळ कारणावरून पत्नी सोनूबाई राठोड (२३) हिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 Anger attempted to burn the wife | रागाच्या भरात पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

रागाच्या भरात पत्नीला जाळण्याचा प्रयत्न

googlenewsNext

पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली भागात राहणाºया जितेंद्र राठोड (३०) याने किरकोळ कारणावरून पत्नी सोनूबाई राठोड (२३) हिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सोनूबाई ४६ टक्के भाजली असून तिच्यावर लातूर येथील लहाने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर खांदेश्वर पोलिसांनी जितेंद्र राठोड याच्यावर पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.
जितेंद्र राठोड आणि त्याची पत्नी हे दोघेही मूळचे लातूर जिह्यातील असून रोजगारानिमित्त पनवेलमध्ये आले होते. पनवेलच्या आकुर्ली भागात भाडड्याने घर घेऊन मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालवीत होते. जितेंद्रला दारूचे व्यसन असल्याने तो कामधंदा करत नव्हता. पत्नीने कामावर न जाण्याबाबत जितेंद्रला जाब विचारल्याने राग येऊन जितेंद्रने पत्नीशी भांडण करून तिला मारहाण केली आणि रागाच्या भरात तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी सोनूबाई ४६ टक्के भाजली गेली. त्यामुळे तिला प्रथम स्थानिक रुग्णालयात नंतर लातूर येथील लहाने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जी. घाडगे यांनी दिली. घटनेनंतर जितेंद्रवर पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याचे घाडगे यांनी सांगितले.

Web Title:  Anger attempted to burn the wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.