जिओ लवकरच आणणार नवी ऑफर

By admin | Published: April 10, 2017 01:11 PM2017-04-10T13:11:18+5:302017-04-10T13:15:34+5:30

जिओ ग्राहकांसाठी लवकरच नवी जबरदस्त ऑफर लाँच करण्याच्या तयारीत आहे

Zio will soon introduce a new offer | जिओ लवकरच आणणार नवी ऑफर

जिओ लवकरच आणणार नवी ऑफर

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - 4जी मोफत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सेवा देऊन ग्राहकांना आकर्षिक करणा-या रिलायन्स जिओनं ट्रायच्या आदेशानंतर समर सरप्राइज ऑफर मागे घेतली आहे. त्यानंतर आता जिओ ग्राहकांसाठी लवकरच नवी जबरदस्त ऑफर लाँच करण्याच्या तयारीत आहे.

जिओची वेबसाईट आणि माय जिओ अॅपवर ""आम्ही आमचा टेरिफ प्लॉन अपडेट करत आहोत. लवकरच मजेदार ऑफर तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत,( We are updating our tariff packs and will be soon introducing more exiciting offers )" असं लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे 9 एप्रिल(रविवार)पर्यंत ज्यांनी रिचार्ज करून सरप्राइज ऑफर घेतली नाही, अशा ग्राहकांसाठी येणारी नवी ऑफर फायदेशीर ठरणार आहे. तर समर सरप्राइज ऑफरअंतर्गत 9 एप्रिलच्या आधी रिचार्ज केलेल्या ग्राहकांना 3 महिन्यांच्या दिलेल्या मोफत सेवेचा लाभ घेता येणार आहे. मात्र समर सरप्राइज ऑफरचं रिचार्ज केलेल्या ग्राहकांकडून जिओ जुलैनंतर पैसे वसूल करणार आहे. 

तत्पूर्वी रिलायन्स जिओनं प्राइम मेंबरशिप घेण्याची मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवून ग्राहकांना समर सरप्राईज ऑफर दिली होती. तसेच जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजे ट्रायच्या आदेशानंतर जिओवर ही ऑफर मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती. ज्या ग्राहकांनी जिओ समर सरप्राइज ऑफर मागे घेण्याआधी प्राइम मेंबरशिप घेतली आहे, अशा ग्राहकांना तीन महिने म्हणजे वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येणार आहे.

जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप

 

सप्टेंबर 2016 मध्ये रिलायन्स जिओने मोफत 4जी अनलिमिटेड डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलिंगची सेवा लाँच केली होती. वेलकम ऑफर असं या सेवेचं नाव होतं. 31 डिसेंबर 2016 ला ही ऑफर संपण्यापूर्वीच कंपनीने ही ऑफर वाढवून पुन्हा हॅप्पी न्यू इयर ही ऑफर लाँच केली. तसेच एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार आहे. जिओ आता स्वस्त लॅपटॉप आणणार असल्याचं वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4जी सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे.

 

Web Title: Zio will soon introduce a new offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.