जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर चिंता

By admin | Published: November 27, 2014 02:37 AM2014-11-27T02:37:48+5:302014-11-27T02:37:48+5:30

जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त करतानाच यावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी सरकारकडे केली.

Worried about the rising prices of life-saving drugs | जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर चिंता

जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर चिंता

Next
नवी दिल्ली : राज्यसभेत बुधवारी प्रमुख विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जीवनरक्षक औषधांच्या वाढत्या किमतींवर गंभीर चिंता व्यक्त करतानाच यावर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पाऊल उचलण्याची मागणी सरकारकडे केली.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टीचे के.पी. राजीव यांनी हा मुद्दा उपस्थित केला. कर्करोग, क्षय, एडस् आणि मधुमेहासारख्या आजारांवरील 1क्8 औषधांच्या किमतीत नुकतीच प्रचंड वाढ झाली असल्याचे त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून           दिले. 
अनेक अमेरिकन कंपन्या औषधांच्या दरवाढीसाठी सरकारवर दबाव आणत असून यामुळेच 1क्8 औषधांच्या किमतींवर सरकारचे नियंत्रण राहिले नाही, असा त्यांचा आरोप होता. कर्करोगाच्या एका औषधाची किंमत 8 हजारावरून एक लाख रुपये एवढी झाली आहे. अशाचप्रकारे मधुमेहाचे 147 रुपयांना मिळणारे औषध एक हजार रुपयांचे झाले आहे, असे राजीव यांनी सांगितले.यावर काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी हा महत्त्वाचा मुद्दा असून सरकारने सभागृहात यावर चर्चा घडवून आणावी, असे मत मांडले. समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव यांनी जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी करण्याची मागणी केली. जीवनरक्षक औषधांच्या आकाशाला भिडणा:या किमतींबाबत आपण पत्रपरिषद घेतली होती. परंतु सरकारतर्फे वाढत्या किमतींबाबत खंडन करण्यात आले, अशी तक्रार संयुक्त जनता दलाचे शरद यादव यांनी केली. (वृत्तसंस्था)

 

Web Title: Worried about the rising prices of life-saving drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.