धक्कादायक! चुकीच्या गटाचं रक्त चढवल्यानं महिला व्हेंटिलेटरवर, पतीनं रुग्णालयाविरोधात केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 04:44 PM2018-06-13T16:44:43+5:302018-06-13T16:44:43+5:30

कोलंबा एशिया रुग्णालयात एका रुग्णाबरोबर डॉक्टरांकडून हलगर्जी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Woman on Ventilator After Infusion of Blood of Wrong Group in Kolkata; Husband Sues Hospital | धक्कादायक! चुकीच्या गटाचं रक्त चढवल्यानं महिला व्हेंटिलेटरवर, पतीनं रुग्णालयाविरोधात केला गुन्हा दाखल

धक्कादायक! चुकीच्या गटाचं रक्त चढवल्यानं महिला व्हेंटिलेटरवर, पतीनं रुग्णालयाविरोधात केला गुन्हा दाखल

googlenewsNext

कोलकाता-  कोलंबा एशिया रुग्णालयात एका रुग्णाबरोबर डॉक्टरांकडून हलगर्जी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात त्या महिला रुग्णाच्या पतीनं रुग्णालय प्रशासनाविरोधात तक्रारही दाखल केली आहे. महिलेची सर्जरी करत असताना तिला चुकीच्या गटाचं रक्त चढवण्यात आल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोलकातातल्या बिधान नगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच त्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. बैशाखी साहा यांच्या पोटात दुखत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 5 जून रोजी त्यांची सर्जरीही झाली. आता त्या रुग्णालयात जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. रुग्णालयात प्रशासनानं A+ रक्तगटाच्या ऐवजी AB+ गटाचं रक्त चढवलं. त्यानंतर बैशाखी साहा यांची प्रकृती खालावत गेली.


बैशाखीचा पती अभिजित साहानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना चिठ्ठी लिहून रुग्णालय प्रशासनाविरोधात कारवाईची मागणी केली. बैशाखीचा पती अभिजित लिहितो, मी माझ्या पत्नीला कोलंबा एशिया रुग्णालयात 5 जून रोजी भरती केलं. सर्जरीदरम्यान तिला चुकीच्या गटाचं रक्त चढवण्यात आलं. त्यामुळे तिची  फुफ्फुसं आणि मूत्रपिंड निकामी झाली. रुग्णालय प्रशासन मला आता बिल न भरल्यास उपचार थांबवू, अशा धमकी देत असल्याचंही पतीनं सांगितलं आहे. मी आधीच 2.5 लाख रुपये भरले आहेत. तर बैशाखीची प्रकृती सुधारत असल्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनानं दिलं आहे. रुग्णालयात बैशाखीला चढवलेल्या चुकीच्या रक्तगटाची समिक्षा करण्यासाठी एक समिती बनवली आहे. तसेच अभिजित साहा यांच्यावर बिल भरण्यासाठी कोणतीही जोरजबरदस्ती केलेली नाही, काही चुकीचं होत असल्याचं त्याची नक्कीच चौकशी केली जाईल, असा खुलासा रुग्णालय प्रशासनानं केला आहे. 

Web Title: Woman on Ventilator After Infusion of Blood of Wrong Group in Kolkata; Husband Sues Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.