पाकिस्तानी कलाकारांना शिक्षा का देता ? - दिग्विजय सिंह

By admin | Published: October 21, 2016 12:02 PM2016-10-21T12:02:18+5:302016-10-21T12:02:18+5:30

'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाला पूर्ण संरक्षण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता दिग्विजय सिंह यांनी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले आहे.

Why do Pakistani artists? - Digvijay Singh | पाकिस्तानी कलाकारांना शिक्षा का देता ? - दिग्विजय सिंह

पाकिस्तानी कलाकारांना शिक्षा का देता ? - दिग्विजय सिंह

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २१ - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 'ए दिल है मुश्किल' चित्रपटाच्या प्रदर्शनाला पूर्ण संरक्षण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता दिग्विजय सिंह यांनी पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन केले आहे. माझा बॉलिवूडला पूर्ण पाठिंबा आहे. विनाकारण पाकिस्तानी कलाकरांना टार्गेट केले जाते असे काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. 
 
फक्त पाकिस्तानी कलाकारांना का शिक्षा देता ? पाकिस्तान सोबत सर्व प्रकारचे संबंध बंद का करत नाही ? असा सवाल दिग्विजय यांनी विचारला आहे. आपण पाकिस्तानबरोबर व्दिपक्षीय चर्चा केली पाहिजे. उगाचच दोन्ही बाजूच्या कलाकारांना टार्गेट करु नका. ते उत्तम दूत होऊ शकतात असे दिग्विज यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. 
 
बॉलिवूडच्या शिष्टमंडळाने काल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन ए दिल है मुश्किल चित्रपटाच्या प्रदर्शनाला संरक्षण देण्याची मागणी केली. चित्रपटात पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने मनसेने हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे. 

Web Title: Why do Pakistani artists? - Digvijay Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.