आम्ही 'फक्त' नमस्ते करायला हात उचलतो, एअर इंडियाची इंडिगोवर उपरोधिक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 11:14 AM2017-11-09T11:14:13+5:302017-11-09T11:15:36+5:30

'आम्ही फक्त नमस्ते म्हणण्यासाठीच हात उचलतो’ अशा कॅप्शनसह एअर इंडियाने त्यांचा मॅस्कॉट ‘महाराजा’चा फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

'We raise our hands only to say Namaste'- Air India on Indigo | आम्ही 'फक्त' नमस्ते करायला हात उचलतो, एअर इंडियाची इंडिगोवर उपरोधिक टीका

आम्ही 'फक्त' नमस्ते करायला हात उचलतो, एअर इंडियाची इंडिगोवर उपरोधिक टीका

Next
ठळक मुद्देदिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याकडून एका प्रवाशाला धक्काबुक्की करण्यात आली होती. सोशल मीडियावर या मारहाणीवरून खिल्लीही उडवली जाते आहे.

मुंबई-  दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याकडून एका प्रवाशाला धक्काबुक्की करण्यात आली होती. प्रवाशाला मारहाण करण्याचं प्रकरण सध्या चांगलंच गाजत असून सोशल मीडियावरही लोक या प्रकरणी आपली मतं मांडत आहे. तसंच सोशल मीडियावर या मारहाणीवरून खिल्लीही उडवली जाते आहे.  या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर इंडिगो एअरलाईन्सवर अनेकांकडून टीका होत आहे. त्यानंतर इंडिगोने माफी मागत संबंधित कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढलं. दुसरीकडे, हवाई वाहतूक क्षेत्रातील इंडिगोची प्रतिस्पर्धी असलेल्या एअर इंडियाने या सगळ्या प्रकारावर उपरोधिकपणे टीका केली आहे.

'आम्ही फक्त नमस्ते म्हणण्यासाठीच हात उचलतो’ अशा कॅप्शनसह एअर इंडियाने त्यांचा मॅस्कॉट ‘महाराजा’चा फोटो ट्विटर, इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तर ‘अनबीटेबल सर्व्हिस’ या दुसऱ्या फोटोतूनही इंडिगोवर निशाणा साधण्यात आला आहे. या पोस्टमध्ये इंडिगोच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आलेला नाही. पण, नुकताच झालेला प्रकार पाहता या टीकेचा रोख इंडिगोवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, जेट एअरवेजच्या नावेही अशाचप्रकारचे एक ट्विट व्हायरल होत आहे. यामध्ये, जेट एअरवेजचा लोगो असलेल्या चित्रावर ‘वी बीट अवर कॉम्पिटिशन, नॉट यू’ असा सूचक ओळी लिहण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही ट्विटस सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत.

नेमकं प्रकरण काय ?
राजीव कात्याल या प्रवाशाने चेन्नईतून दिल्लीला येण्यासाठी 6E 487 या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केलं. विमानातून उतरल्यानंतर कात्याल यांचा इंडिगोच्या एका कर्मचाऱ्यांशी वाद झाला. कात्याल यांनी शिवी दिल्याचा आरोप इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी केला. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे कात्याल आणि कर्मचारी यांच्यात वाद सुरु असताना या कर्मचाऱ्यांनी त्यांना बसमध्ये जाऊ दिलं नाही. त्यानंतर इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यांना धक्काबुक्की केली. 
 

Web Title: 'We raise our hands only to say Namaste'- Air India on Indigo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.