कंधारात ८० गावांत बसणार जलशुद्धीकरण यंत्र

By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30

मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका

Water purification machine in 80 villages | कंधारात ८० गावांत बसणार जलशुद्धीकरण यंत्र

कंधारात ८० गावांत बसणार जलशुद्धीकरण यंत्र

Next
गासक्षेत्र विकास अनुदान निधीतून ग्रामस्थांचे आरोग्य फुलणार, फ्लोराईडयुक्त पाण्यापासून अनेक गावांची सुटका
कंधार : अशुद्ध पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवितात़ त्यामुळे रोगराईचा सामना करावा लागतो़ जलशुद्धीकरण यंत्र ८० गावांत बसविण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ मागासक्षेत्र विकास अनुदान निधीतून आरोग्य फुलणार असून फ्लोराईडयुक्त पाणी सेवन करणार्‍या अनेक गावांची आता सुटका होणार असल्याचे समोर आले आहे़
दूषित पाण्याने कावीळ, गॅस्ट्रो, टायफाईड, त्वचा, विषाणूजन्य आजार, घसादुखी आदी रोगाचा प्रखरपणे सामना करावा लागतो़ त्यात पुन्हा जमिनीतील खोलवरचे पाणी व फ्लोराईडयुक्त असेल तर दंत व अस्थीविकाराचा सामना करावा लागतो़ अशा स्थितीत शेती करण्यास मोठी अडचण निर्माण होते़ आरोग्यमय जीवनासाठी शुद्ध पाणी असणे गरजेचे आहे़ २०१४-१५ मधील मागासक्षेत्र विकास आराखडा पंचायत समितीने प्रस्तावित केला होता़ त्याला मंजुरी मिळाली आहे़ निधी टप्प्याटप्प्याने मिळतो़
शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी औराळ येथे ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात येणार आहेत़ बाभूळगाव, बाचोटी, भुत्याचीवाडी, बिजेवाडी, बोरी खु़, चिखलभोसी, चिंचोली (प़क़), चौकीधर्मापुरी, दिग्रस बु़, गांधीनगर, गऊळ, घागरदरा, घोडज, घुबडवाडी, गोगदरी, गोणार, गुंटूर, हाडोळी (ब्र), हाळदा, हटक्याळ, हिप्परगा (शहा), इमामवाडी, जाकापूर, जंगमवाडी, कल्हाळी, कौठा, खंडगाव (ह़), लाडका, लालवाडी, महालिंगी, मजरे धर्मापुरी, मंगलसांगवी, मंगनाळी, मानसिंगवाडी, मरशिवणी, मसलगा, मुंडेवाडी, नागलगाव, नंदनशिवणी, नवरंगपुरा, पानभोसी, पांगरा, पानशेवडी, पाताळगंगा, पेठवडज, पोखर्णी, रहाटी, रामानाईकतांडा, राऊतखेडा, संगमवाडी, संगुचीवाडी, शिराढेण, शिरसी बु़, शिरसी खु़, शिरूर, सोमठाणा, तेलूर, उमरगा (खो़), वहाद, वाखरड, वरवंट, येलूर, बारूळ, बोळका, बामणी (पक), बहाद्दरपुरा, बोरी बु़, चिखली, धानोरा कौठा, कुरुळा, मानसपुरी, फुलवळ, रूई, शेकापूर, उमरज, उस्माननगर, तेलंगवाडी या गावांचा समावेश आहे़ प्रतयेक गावांत ३ लाखांचे जलशुद्धीकरण यंत्राची त्यातून सोय होणार आहे़
हा आराखडा सर्वसाधारण व अनु़जाती-जमाती आदी वर्गांना उपयुक्त रहावा, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले़ लोकसंख्येच्या प्रमाणात वर्षाला निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे़ त्यामुळे कामे अर्धवट राहण्याचाही धोका आहे़ तसेच पाणीस्त्रोत्र बळकट आहे का, पाणीस्त्रोत्र मुबलक उपलब्ध आहे का, याची स्थानिक प्रशासनाने शहानिशा करण्याचे मोठे आव्हान आहे़ ५०० लिटर प्रतिघंटा आणि १ हजार लि़प्रतिघंटा पाणी शुद्ध मिळणार आहे़ त्यासाठी ग्रामस्थांना अत्यल्प दरात पाणी मिळेल़

Web Title: Water purification machine in 80 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.