गुजरातमध्ये राहुल गांधीचे मंदिर दर्शन आणि गरबा; भाजपाच्या हिंदुत्वाला उत्तर देण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 02:12 AM2017-09-28T02:12:53+5:302017-09-28T02:13:05+5:30

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरेंद्र नगरमधील प्रसिद्ध चोटिला मंदिरात बुधवारी प्रार्थना केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी राज्याचा तीन दिवसांचा दौरा केला.

Visitors of Rahul Gandhi's temple in Gujarat and Garba; BJP's attempt to answer Hinduism? | गुजरातमध्ये राहुल गांधीचे मंदिर दर्शन आणि गरबा; भाजपाच्या हिंदुत्वाला उत्तर देण्याचा प्रयत्न?

गुजरातमध्ये राहुल गांधीचे मंदिर दर्शन आणि गरबा; भाजपाच्या हिंदुत्वाला उत्तर देण्याचा प्रयत्न?

Next

चोटिला (गुजरात) : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सुरेंद्र नगरमधील प्रसिद्ध चोटिला मंदिरात बुधवारी प्रार्थना केली. गुजरात विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गांधी यांनी राज्याचा तीन दिवसांचा दौरा केला. त्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता.
उंच डोंगरावर हे मंदिर असून राहुल गांधी यांनी देवी चामुंडाचे दर्शन व प्रार्थना करण्यासाठी सुमारे एक हजार पायºया चढल्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी सौराष्ट्रातील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराला भेट देऊन आपल्या मोहिमेला प्रारंभ केला होता. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की गांधी यांचा वेगवेगळ््या मंदिरांना भेट देण्याचा उद्देश हा भाजपच्या कडव्या हिंदुत्व भूमिकेला शह देण्याचा आहे.
राजकोटहून गांधी सकाळी चोटिलात आले व त्यांनी सुमारे १५ मिनिटांत एक हजार पायºया विश्रांती न घेता चढल्या. मंदिरात प्रार्थना केल्यानंतर पुजाºयांनी या मंदिराचे धार्मिक महत्त्व त्यांना सांगितले. नंतर गांधी १५ मिनिटांत पायºया उतरले व दरम्यान भक्तांना अभिवादनही केले.
गुजरात प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते मनीष दोशी यांनी काँग्रेस पक्ष हा हिंदुंच्या विरोधात असल्याचा प्रचार भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हेतुत: केला, असा आरोप केला. गुजरात भाजपचे प्रवक्ते राजू ध्रुव यांनी काँग्रेस पक्ष कोणत्याच निवडणुका जिंकत नसल्यामुळे राहुल गांधी मंदिरांना भेट देत फिरत असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

दुर्गादेवीची आरती
अनेक वर्षांपासून काँग्रेस कोणत्याही राज्यात निवडणुका जिंकत नसल्यामुळे राहुल गांधी यांनी मंदिरांना आणि धार्मिक स्थळांना भेट द्यायला सुरुवात केल्याचे ध्रुव म्हणाले.
राजकोटमध्ये राहुल गांधी मंगळवारी आमदार इंद्रनील राजगुरू यांनी आयोजित केलेल्या गरबा कार्यक्रमाला उपस्थित होते व त्यांनी तेथे रात्री दुर्गादेवीची आरतीही केली.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात काँग्रेसच्या बाजुने मोठे जनमत असल्याचा दावा गांधी यांनी केला.

Web Title: Visitors of Rahul Gandhi's temple in Gujarat and Garba; BJP's attempt to answer Hinduism?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.