‘विराट’ युद्धनौकेचे होणार वस्तुसंग्रहालय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 04:15 AM2018-11-02T04:15:17+5:302018-11-02T06:53:37+5:30

८५२ कोटी रुपये खर्च करणार; सिंधुदुर्गातील निवती रॉक्स येथील जागा निश्चित

The 'Viraat' warships will be organized in the museum | ‘विराट’ युद्धनौकेचे होणार वस्तुसंग्रहालय

‘विराट’ युद्धनौकेचे होणार वस्तुसंग्रहालय

googlenewsNext

मुंबई : गौरवशाली इतिहास असणाऱ्या आयएनएस विराट युद्धनौकेचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याच्या प्रस्तावास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मान्यता देण्यात आली. ८५२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

मार्च २०१७ मध्ये ती भारतीय नौसेनेच्या सेवेतून निवृत्त झाली. सध्या ती नौसेना गोदीमध्ये (नेव्हल डॉकयार्ड) ठेवण्यात आली आहे. भारतीय नौसेनेचा समृद्ध इतिहास नव्या पिढीला माहिती व्हावा तसेच शालेय-महाविद्यालयीन तरुणांमध्ये सागरी क्षेत्रामध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी तिचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. 

वस्तुसंग्रहालय सिंधुदुर्गात
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय संरक्षण मंत्रालयास सादर केलेल्या प्राथमिक प्रस्तावानुसार ही नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक्स येथे किनाºयापासून सात सागरी मैल अंतरावरील समुद्रात काँक्रीट पायाभरणी करून स्थापित करण्यात येईल. तेथील वैविध्यपूर्ण सागरी जैवविश्व पर्यटकांना पाहता येणार आहे. साहसी सागरी खेळांसाठी तिचा वापर होऊ शकेल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती ही या प्रकल्पासाठी निविदेचा तपशील निश्चित करेल.

जहाजावर सागरी प्रशिक्षणाची सुविधा
सागरी प्रशिक्षणासाठीही जहाजावर सुविधा उपलब्ध होणार असून व्यापारी जहाजावर काम करणाºया व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचाही प्रस्ताव आहे. वस्तुसंग्रहालयात सागरी क्षेत्राशी संबंधित वस्तू, दृकश्राव्य कार्यक्रम, सागरी क्षेत्राचा इतिहास सांगणारे आभासी दालन आदी सुविधा असतील.

Web Title: The 'Viraat' warships will be organized in the museum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.