Video: 'आमच्याकडे डोळे वर करून बघितलं तरी डोळे काढून हातात देऊ', पंतप्रधान मोदींना धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 05:22 PM2017-09-26T17:22:48+5:302017-09-26T17:34:58+5:30

संपूर्ण व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अत्यंत हीन भाषेचा वापर व्हिडीओमध्ये या व्यक्तीने केला आहे. 

Video: 'When we look up our eyes, give our eyes closed,' threatens Prime Minister Modi | Video: 'आमच्याकडे डोळे वर करून बघितलं तरी डोळे काढून हातात देऊ', पंतप्रधान मोदींना धमकी 

Video: 'आमच्याकडे डोळे वर करून बघितलं तरी डोळे काढून हातात देऊ', पंतप्रधान मोदींना धमकी 

googlenewsNext

मुंबई - पाकिस्तानच्या कुरापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत. तेथील सैन्याच्या कुरापती कमी की काय तर आता पाकिस्तानच्या एका नागरिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी दिली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक मुस्लिम व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देताना दिसतोय. स्वतः पाकिस्तानी असल्याचं हा व्यक्ती सांगतो. पाकिस्तानकडे डोळे वर करून बघण्याचा जरी प्रयत्न केला तरी डोळी काढून हातात देऊ असं चिथावणीखोर वक्तव्य या व्यक्तीने केलं आहे. संपूर्ण व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आणि भारताबाबत अत्यंत हीन भाषेचा वापर व्हिडीओमध्ये या व्यक्तीने केला आहे. 

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती साधारण 30-35 वर्षांचा आहे. पांढरा कुर्ता घालून हा व्यक्ती भारतीय लष्कर आणि पंतप्रधान मोदींचं वाटोळं  करू अशी धमकी देत आहे. 
पाहा व्हिडीओ -

Web Title: Video: 'When we look up our eyes, give our eyes closed,' threatens Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.