हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:05 PM2022-03-08T18:05:02+5:302022-03-08T18:25:07+5:30

Dowry Case : हा मुलगा सरकारी नोकरी करत असून त्याचे वडील शिक्षक आहेत. ही घटना बिहारमधील चपलपुर गावातील आहे.

Video of groom sitting on a dove for demandig dowry is Viral, angry reaction of people | हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral, लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया

googlenewsNext

आज जागतिक महिला दिनी सोशल मीडियावर महिलेसोबत लग्न करण्यास एक पुरुष हुंड्यासाठी अडून बसल्याचं समजत आहे. भारतात हुंडाबंदी कायदा असला तरी अनेक राज्यांत त्याचे पालन केले जातेच असे नाही. प्रत्येक राज्याचे सरकार हुंडा प्रथा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते. पण तरीही अनेक ठिकाणी हुंडा घेतला जात आहे. काही लोकं हुंडा घेणे हा हक्क मानतात. लग्नमंडपात हुंड्यावरून अडून बसणे, नववधूचा छळ करणे, तिला त्रास देणं आणि लग्न मोडलेले असे अनेक महाभाग आहेत. नुकताच सोशल मीडियावर असाच व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतील नवऱ्याच्या मागण्या बघून लोकं प्रचंड संतापले आहेत. वधूकडच्यांनी मुलाच्या मागण्या मान्य न केल्याने ऐन लग्नातच हुंडा नाही दिला तर लग्न मोडण्याची धमकी नवरा मुलगा देत असल्याचं व्हिडिओत बघायला मिळते. हा मुलगा सरकारी नोकरी करत असून त्याचे वडील शिक्षक आहेत. ही घटना बिहारमधील चपलपुर गावातील आहे. 

या व्हिडिओत मुलगा-मुलगी स्टेजवर खुर्चीवर बसले आहेत. व्हिडिओ तयार करणारा माणूस लग्न का करायची नाही ?असे विचारतो. तेव्हा आपली डिमांड पूर्ण न झाल्याने असं करत असल्याचे नवरा सांगतो. पैसे किंवा सामान अजूनही मिळालेले नसून मी कोणत्या आधारावर लग्न करू असं नवरा बोलताना व्हिडिओत दिसत आहे. हुंडा घेणं आणि देणं पाप असल्याचं व्हिडीओ तयार करणारा मानून म्हणतो, त्यावर चुकीचं काय आहे. कोण म्हणतं हुंडा घेणं चुकीचं आहे. मला मिळाला म्हणून तुम्हाला कळलं, मिळाला असता तर कळालं नसतं असं नवरा व्हिडिओत बोलताना दिसत आहे. 

ट्विटरवर हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबराने शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात.जोपर्यंत देशात हुंडा मागण्याची लोभी मानसिकता कमी होत नाही तोवर Womens Day, Women Empowerment Day असं मानणं व्यर्थ आहे. अशा माणसांना शिक्षा होणे गरजेचे आहे.

Web Title: Video of groom sitting on a dove for demandig dowry is Viral, angry reaction of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.