Video - अरे देवा! ध्वजारोहणानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरले; दोन ओळींनंतर थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 11:50 AM2021-08-16T11:50:10+5:302021-08-16T11:56:11+5:30

MP ST Hasan And National Anthem : ध्वजारोहण कार्यक्रमानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरल्याची घटना समोर आली आहे.

Video moradabad sp mp st hasan forget national anthem after flag hoisting | Video - अरे देवा! ध्वजारोहणानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरले; दोन ओळींनंतर थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले

Video - अरे देवा! ध्वजारोहणानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरले; दोन ओळींनंतर थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले

Next

नवी दिल्ली - देशभरात 75 वा स्वातंत्र्यदिन (Celebration 15th Auguest 2021) अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आहे. विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच नवी दिल्लीसह देशभर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. याच दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रमानंतर खासदार राष्ट्रगीतच विसरल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये ही घटना घडली आहे. सपा खासदार डॉ. एस.टी. हसन (MP ST Hasan) झेंडावंदन केल्यानंतर राष्ट्रगीतच विसरल्याची घटना समोर आली आहे. पहिल्या काही ओळ म्हटल्यानंतर ते थेट शेवटच्या ओळीवर पोहोचले. 

सपा खासदारांचा राष्ट्रगीत म्हणतानाचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतर लोकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच इतर पक्षांच्या नेत्यांनी देखील हसन यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादच्या गलशहीद पार्कमध्ये स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला सपाचे खासदार डॉ. एसटी हसन यांच्यासह जिल्हा अध्यक्ष डीपी यादव, महानगर अध्यक्ष शाने अली आणि अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केलं. 

ध्वजारोहण झाल्यानंतर प्रत्येकाने राष्ट्रगीत गायला सुरुवात केली, पण जेव्हा ते दुसऱ्या ओळीवर अडकले तेव्हा त्यांनी इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. सर्वच जम राष्ट्रगीत विसरले. यानंतर एस.टी. हसन यांनी थेट शेवटची ओळ म्हणजेच जय हो म्हणायला सुरुवात केली आणि ते कार्यक्रम संपवून निघून गेले. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला. भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी खासदारांचा राष्ट्रगीत म्हणतानाचा हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच "वाह समाजवादियों वाह" असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"निवडणुकीत शोपीससारखं वापरलं जातं अन् जिंकल्यावर बाजूला केलं जातं; मी तुम्हाला शब्द देतो की..." 

देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त चंदीगडमधल्या सेक्टर 15 मधील काँग्रेस भवन ते सेक्टर 25 पर्यंत पंजाब युवक काँग्रेसचे कार्यकर्तें आणि नेत्यांकडून एका विशाल तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. नवनियुक्त पंजाब (Punjab) काँग्रेस (Congress) अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित केलं आहे. "निवडणुकीदरम्यान शोपीससारखं वापरलं जातं आणि निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना बाजूला केलं जातं" असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना "पंजाबवर प्रेम करण्याऱ्यांना निवडणुकीदरम्यान शोपीससारखं वापरलं जातं. निवडणुका जिंकल्यानंतर त्यांना बाजूला केलं जातं. त्याऐवजी नफा कमवण्यात रस घेण्याऱ्या लोकांना घेतलं जातं. मी तुम्हाला शब्द देतो. मी तुमच्यातील गुणवत्तेचा आदर करेन आणि तरुणांचा सन्मान करेन' असं सिद्धू यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Video moradabad sp mp st hasan forget national anthem after flag hoisting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.