Video: घृणास्पद! रस्त्यावर झोपलेल्या वृद्धाच्या गुप्तांगाला लावली आग

By admin | Published: June 13, 2017 03:38 PM2017-06-13T15:38:45+5:302017-06-13T15:38:45+5:30

सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरूण रस्त्याच्या कडेला झोपलेल्या बेघर वृद्धाला अमानूषपणे मारहाण करताना दिसत आहेत.

Video: Disgusting! The fire on the street lying on the street in the Guptanga | Video: घृणास्पद! रस्त्यावर झोपलेल्या वृद्धाच्या गुप्तांगाला लावली आग

Video: घृणास्पद! रस्त्यावर झोपलेल्या वृद्धाच्या गुप्तांगाला लावली आग

Next

ऑनलाइन लोकमत

चेन्नई, दि. 13 - सोशल मीडियावर एक हैराण करणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही तरूण रस्त्याच्या कडेला झोपलेल्या बेघर वृद्धाला अमानूषपणे मारहाण करताना दिसत आहेत. केवळ मारहाणीवर हे तरूण थांबले नाहीत तर सर्व मर्यादा ओलांडत त्यांनी या लाचार वृद्धाच्या गुप्तागाला आग लावली. अत्यंत घृणास्पद असलेला हा व्हिडीओ चेन्नईमधील असल्याचं बोललं जात आहे. 
 
हिंदी न्यूज चॅनल आज तकच्या वृत्तानुसार 4 जून रोजी ही घटना घडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून दोषी तरूणांना कडक शित्क्षा करण्याची मागणी केली जात आहे. घटनेच्या वेळी दोषी तरूणांनी मोठ्या प्रमाणात नशा केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.    
 
व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेला एक वृद्ध दिसत आहे. रात्रीच्या अंधारात  चार ते पाच तरूण तेथे येतात आणि त्या वृद्धाच्या गुप्तांगाला आग लावतात. कसातरी तो वृद्द आपली धोती सोडून तेथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. तरीही या तरूणांना दया येत नाही उलट त्या वृद्धाला ते लाथा-बुक्क्यांनी अजून मारहाण करतात. 
 

Web Title: Video: Disgusting! The fire on the street lying on the street in the Guptanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.