उत्तरेत पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी; दिल्लीसह अन्य राज्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:51 AM2018-05-14T03:51:48+5:302018-05-14T03:51:48+5:30

धुळीचे वादळ आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत एकूण ४१ जणांचा बळी गेला असून मोठी नुकसानही झाले.

Uttarakhand floods hit 41 people; Damage to other states including Delhi | उत्तरेत पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी; दिल्लीसह अन्य राज्यांचे नुकसान

उत्तरेत पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी; दिल्लीसह अन्य राज्यांचे नुकसान

Next

नवी दिल्ली : धुळीचे वादळ आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत एकूण ४१ जणांचा बळी गेला असून मोठी नुकसानही झाले.
पश्चिम बंगालमध्ये वादळात ४ मुलांसह १२ जणांचा बळी गेला तर उत्तर प्रदेशात १८ जणांचा बळी व दिल्लीत २ जण ठार झाले.उत्तर भारतामध्ये अनेक ठिकाणी विजेचे खाम कोसळले तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. रेल्वे आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली. १० दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि पंजाब येथे आलेले वादळाने १३४ जणांचा मृत्यू झाला होता.
हवामान विभागनुसार, या वादळाचा तडाखा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा, चंदीगढ, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, मेघालय, महाराष्टÑ, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांतील काही भागातही बसला. दिल्लीत १०९ किमी प्रति तास या वेगाने धुळीचे वादळ आले. त्यामुळे दोन जण ठार आणि १९ जण जखमी झाले. मेट्रो वाहतुकीलाही याचा फटका बसला.

आजही वादळ
सोमवारीही दिल्लीसह उत्तरेतील काही राज्यांना वादळाचा फटका बसेल. ७० किमी प्रति तास या वेगाने धुळीचे वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याच्या के साथीदेवी यांनी दिला आहे.

Web Title: Uttarakhand floods hit 41 people; Damage to other states including Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.