उत्तर प्रदेशची परिस्थिती इराक, सीरियासारखी - अमेरिका

By Admin | Published: July 31, 2014 03:36 PM2014-07-31T15:36:59+5:302014-07-31T15:58:29+5:30

धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीबाबत अमेरिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालात उत्तर प्रदेशची अवस्था इराक व सीरियाप्रमाणे झाली आहे,अशी टीका करण्यात आली आहे

Uttar Pradesh's situation is like Iraq, Syria - US | उत्तर प्रदेशची परिस्थिती इराक, सीरियासारखी - अमेरिका

उत्तर प्रदेशची परिस्थिती इराक, सीरियासारखी - अमेरिका

googlenewsNext

ऑनलाइन टीम

लखनऊ, दि. ३१ - जगभरातील देशांमधील धार्मिक स्वातंत्र्याच्या स्थितीबद्दल अमेरिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या अहवालामध्ये भारतातील उत्तर प्रदेशवर निशाणा साधण्यात आला असून या राज्याची अवस्था इराक व सीरियाप्रमाणे झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे.  राज्यात धार्मिक मुद्यांवरून होणा-या भेदभावाविरोधात कोणतीही कारवाई करण्यास उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे.  अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या ' आंतराराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य २०१३' या अहवालाचे हे १६ वर्ष असून यात धार्मिक स्वातंत्र्याच्या उपेक्षेच्या घटना जगभरात कधी व कोठे घडल्या हे नमूद करण्यात येते
सीरिया, बांग्लादेश, श्रीलंका व इराक या देशांतील परिस्थितीशी उत्तर प्रदेशची तुलना करण्यात आली असून  असहिष्णु व हिंसक  समाजाची धार्मिक मान्यतेच्या मुद्यांच्या आधारावर लोकांवर हल्ले करण्याची ताकद वाढेल, अशी परिस्थिती उत्तर प्रदेश सरकारने निर्माण होऊ दिल्याचे अहवालात म्हटले आहे.  कमकुवत समुदायातील लोकांची रक्षा करण्यास उत्तर प्रदेश सरकार अपयशी ठरल्यामुळे अल्पसंख्यांक समाजावार याचा परिणाम झाला व अनेक लोकांना विस्थापित व्हावे लागले, असेही या अहवालात म्हटले आहे. 
या अहवालात गेल्या वर्षी झालेल्या मुजफ्फरनगरमधील दंगलींचाही उल्लेख आहे. या दंगलीत ६५ लोकांना आपला जीव गमववा लागला, ६८ नागिक जखमी झाले तर सुमारे ४० ते ५० हजार लोकांना विस्थापित व्हावे लागल्याचे अहवालात म्हटले आहे. 'कुटुंबातील एका महिलेची छेड काढल्याच्या आरोपावरून दोन हिंदू युवकांनी एका मुस्लीम युवकाला ठार मारल्याच्या घटनेनंतर तेथे दंगल भडकली.  ७ सप्टेंबर रोजी तेथे सशस्त्र जमाव जमलेला असतानाही स्थानिक पोलिस व लष्कराने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तसेच तेथील राजकीय व धार्मिक नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांनंतरही  स्थानिक प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही, ' असेही लेखात म्हटले आहे. 

Web Title: Uttar Pradesh's situation is like Iraq, Syria - US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.