टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सची चिप देणार दर्शकांची आकडेवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 03:37 AM2018-04-16T03:37:20+5:302018-04-16T03:37:20+5:30

माहिती व प्रसारण मंत्रालयाने नव्या टेलिव्हिजन सेट टॉप बॉक्समध्ये एक चिप लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोणते चॅनल आणि किती वेळ पाहिले गेले? याची माहिती या चिपमधून मिळणार आहे.

TV set-top box chip-driven viewers statistics | टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सची चिप देणार दर्शकांची आकडेवारी

टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सची चिप देणार दर्शकांची आकडेवारी

Next

नवी दिल्ली - माहिती व प्रसारण मंत्रालयाने नव्या टेलिव्हिजन सेट टॉप बॉक्समध्ये एक चिप लावण्याचा प्रस्ताव दिला आहे. कोणते चॅनल आणि किती वेळ पाहिले गेले? याची माहिती या चिपमधून मिळणार आहे. मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक चॅनलच्या दर्शकांचे विश्वसनीय आकडे एकत्र करणे, हा यामागचा उद्देश आहे.
जाहिरात आणि दृश्य प्रसिद्धी संचालनालय (डीएव्हीपी) हे विविध मंत्रालय आणि त्यांच्या संघटनांच्या जाहिरातीसाठी सरकारची नोडल एजन्सी आहे. नव्या प्रस्तावात मंत्रालयाने ट्रायला सांगितले आहे की, डीटीएच आॅपरेटर्सला नव्या सेट टॉप बॉक्समध्ये चिप लावण्याबाबत सांगण्यात यावे. कोणते चॅनल किती वेळ पाहिले जातात याची माहिती ही चिप देईल. हा प्रस्ताव म्हणजे लायसन्ससंबंधित मुद्यांवर ट्रायकडून देण्यात आलेल्या शिफारशींवर मंत्रालयाची प्रतिक्रिया आहे.

एकाधिकारशाही संपुष्टात आणणार

अधिकाºयांनी सांगितले की, मंत्रालयाला असे वाटते की, दूरदर्शनची दर्शक संख्या कमी सांगितली जाते. चिप लावल्यानंतर चॅनलची खरी दर्शक संख्या आकडेवारीतून समोर येईल. ब्रॉडकास्ट आॅडियन्स रिसर्च काऊंसिल इंडियाची (बार्क) एकाधिकारशाही संपुष्टात आणणे हा यामागचा उद्देश आहे.
एक प्रकारे सध्या बार्कला काहीही पर्याय नाही. हे सांगितले जात नाही की, दर्शक संख्येचे आकडे त्यांनी कसे जमा केले आणि त्यांची प्रक्रिया काय आहे? त्यांच्या सर्वेक्षणाचा भूभाग कोणता आहे?

Web Title: TV set-top box chip-driven viewers statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.