‘आज चौकीदार है सेल्समन और दुकानदार’, काँग्रेसचा ट्विटरवर टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 06:06 AM2019-03-27T06:06:31+5:302019-03-27T06:06:48+5:30

जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नमो अ‍ॅप आणि वेबसाइटवरून आता ‘नमो अगेन’ असे घोषवाक्य प्रिंट केलेले टी-शर्ट, पेन, डायरी, स्टिकर्स अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची विक्री सुरू झाली आहे.

Today's watchman is salesman and shopkeeper, Congress tweets on Twitter | ‘आज चौकीदार है सेल्समन और दुकानदार’, काँग्रेसचा ट्विटरवर टोला

‘आज चौकीदार है सेल्समन और दुकानदार’, काँग्रेसचा ट्विटरवर टोला

Next

नवी दिल्ली : जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या नमो अ‍ॅप आणि वेबसाइटवरून आता ‘नमो अगेन’ असे घोषवाक्य प्रिंट केलेले टी-शर्ट, पेन, डायरी, स्टिकर्स अशा अनेक प्रकारच्या साहित्यांची विक्री सुरू झाली आहे. त्यावर ट्विटरवरून टीकेचा सूर उमटू लागला आहे.
हे साहित्य विक्री करण्यासाठी नरेंद्रमोदीडॉटइन या वेबसाइटवर एक वेबपेज तयार करण्यात आले आहे. त्यावर आॅनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांप्रमाणेच वस्तूंची विक्री केली जात आहे. ‘या साहित्यांची खरेदी करून आणि ‘नमो अगेन’ असे टी-शर्ट घालून ३१ मार्चच्या ‘मैं भी चौकीदार’ कार्यक्रमास आल्यास मला आनंद होईल. तुम्ही हे आॅर्डर केलेय ना!’ असे
ट्विटही नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च रोजी केले होते. त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ‘आज चौकीदार जी सेल्समन है’ असे ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी आणखी एक ट्विट करून ‘चौकीदार दुकानदार है,’ अशी कोपरखळीही मारली.
या वस्तूंच्या मार्केटिंगसाठी नमो मर्चंेडाइज नावाचे ट्विटर हँडल सप्टेंबरमध्ये सुरू करण्यात
आले. त्याला खुद्द मोदीही फॉलो करतात.

काय आहे विक्रीला
टी-शर्ट, मोदी जॅकेट, हुडीज, बॅजेस, व्रिस्टबँड, नोटबुक, स्टिकर्स, मॅग्नेटिक स्टिकर्स, कप, टोप्या, पेन, मोदींची पुस्तके, की-चेन्स, पताके, मास्क, भिंतीवरील घड्याळ विशेष म्हणजे या सर्व वस्तूंवर भाजपाचे चिन्ह व नमो अगेन असे प्रिंट केलेले आहे.

Web Title: Today's watchman is salesman and shopkeeper, Congress tweets on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.