'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:49 PM2023-12-20T13:49:01+5:302023-12-20T13:55:07+5:30

विरोधकांच्या आघाडीच्या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.

tmc chief mamata banerjee says i propose mallikarjun kharge name for pm post India alliance meeting | 'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

'मी पंतप्रधान पदासाठी...' I.N.D.I.A. संदर्भात काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

INDIA Alliance Meeting Update ( Marathi News )पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याच्या इराद्याने स्थापन झालेल्या विरोधकांच्या I.N.D.I.A. ची मंगळवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पतप्रधान पदाच्या उमेदवारासह जागावाटपासंदर्भात अनेक मुद्यांव चर्चा झाली. यानंतर तृणमून काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिल्लीमध्ये बुधवारी पत्रकारांसोबत बोलताना ममता म्हणाल्या, "मी I.N.D.I.A. आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. केजरीवाल यांनी त्याला समर्थन दिले. नीतीश यांच्या नाराजीसंदर्भात माहीत नाही."

I.N.D.I.A. बाठकीत काय घडले? -
विरोधी आघाडीच्या या बैठकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मल्लीकार्जुन खर्गे यांचा प्रस्ताव ठेवताना ममता म्हणाल्या की, ते देशाचे पहिले दलित पंतप्रधान होऊ शकतात. यानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. मात्र, याच वेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी, सर्वप्रथम निवडणूक जिंकणे महत्वाचे आहे, असे म्हणत याला नकार दिला.

याच बरोबर, जागावाटपासंदर्भात माध्यमांसोबत बोलताना आरजेडी खासदार मनोज झा म्हणाले, “यासंदर्भात स्पष्ट चर्चा झाली. जागावाट आणि जनसंपर्क कार्यक्रम पुढील 20 दिवसांच्या आत सुरू होईल आणि लवकरात लवकर निर्णयही होईल.” याशिवाय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आघाडीत सहभागी असलेल्या पक्षांनी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जागावाटपाला अंतिम रूप देण्याचा नर्णय घेतला आहे. 

बैठकीत या नेत्यांनी घेतला होता सहभाग- 
विरोधकाांची ही बैठक दिल्लीतील हॉटेल अशोकमध्ये पार पडली. या बैठकीला काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केसी वेणुगोपाल, जेडीयूकडून नीतीश कुमार आणि राजीव रंजन सिंह, टीएमसीकडून ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी, आरजेडीकडून लालू प्रसाद आणि तेजस्वी यादव, एनसीपीकडून शरद पवार, शिवसेना (यूबीटी)कडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या बैठकीला उपस्थित होते.

याशिवाय, समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव, डीएमकेकडून एमके स्टॅलिन आणि टीआर बालू, नॅशनल कॉन्फ्रन्सकडून फारूक अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) कडून महेबूबा मुफ्ती, राष्ट्रीय लोक दलाकडून जयंत चौधरी, अपना दल (के) कडून कृष्णा पटेल आणि पल्लवी पटेल आदी नेते या बैठकीत सहभागी झाले होते.

Web Title: tmc chief mamata banerjee says i propose mallikarjun kharge name for pm post India alliance meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.