धावत्या ट्रेनमध्ये 'थ्री इडियट्स'नी केली महिलेची प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:00 PM2019-03-04T17:00:56+5:302019-03-04T17:14:14+5:30

थ्री इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आलेली गर्भवती महिलेची डिलिव्हरी तुम्हाला आठवत असेलच. पण असाच प्रकार चक्क धावत्या ट्रेनमध्ये घडला आहे.

Three Idiots have delivered the woman's delivery on the moving train | धावत्या ट्रेनमध्ये 'थ्री इडियट्स'नी केली महिलेची प्रसुती

धावत्या ट्रेनमध्ये 'थ्री इडियट्स'नी केली महिलेची प्रसुती

Next
ठळक मुद्देथ्री इडियट्स चित्रपटात दाखवण्यात आलेली गर्भवती महिलेची डिलिव्हरी तुम्हाला आठवत असेलच. पण असाच प्रकार चक्क धावत्या ट्रेनमध्ये घडला आहेरविवारी आगरतळा-हबीबगंज एक्स्प्रेस जलपैगुडीजवळ आली असताना एक महिला प्रसववेदनेने विव्हळत असल्याचे काही जणांनी पाहिले

कोलकाता - आमीर खानचा थ्री इडियट्स हा धम्माल चित्रपट पाहिला नाही, अशा व्यक्ती सापडणे विरळाच. या तीन मित्रांनी केलेल्या करामती आणि शेवटी केलेली गर्भवती महिलेची डिलिव्हरीही तुम्हाला आठवत असेलच. पण असाच प्रकार चक्क धावत्या ट्रेनमध्ये घडला आहे. पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथे चालत्या ट्रेनमध्ये प्रसववेदनेने विव्हळत असलेल्या असहाय महिलेची प्रसुती तीन मित्रांनी केल्याची घटना समोर आली आहे.  

याबाबतची सविस्तर हकीकच अशी की, रविवारी आगरतळा-हबीबगंज एक्स्प्रेस जलपैगुडीजवळ आली असताना एक महिला प्रसववेदनेने विव्हळत असल्याचे काही जणांनी पाहिले. त्यावेळी त्या ट्रेनमधून प्रवास करत असलेले मोहम्मद सोहराब, त्रिभुवन सिंह आणि सुभेदार गडवा हे तीन मित्र या महिलेच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी या महिलेची सुखरूप प्रसुती केली. 

या महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्यावर ट्रेनमध्ये डॉक्टर आहे का याचा शोध सुरू झाला. मात्र या तिघांनाही ट्रेनमध्ये डॉक्टर सापडला नाही. अखेरीस त्यांनी सहप्रवाशांकडून काही कपडे आणि इतर सामान गोळा केले. नंतर  स्वत:च या महिलेची प्रसुती केली. सर्व व्यवस्थित पार पडल्यावर बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

मात्र बाळाचा जन्म झाल्यानंतर नाळ हटवणे आवश्यक असते. मात्र याबाबत कुणालाच अनुभव नव्हता. त्यामुळे साखळी ओढून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेन थांबली नाही. त्यानंतर सोहराब यांनी मदतीसाठी फोन केला. त्यावेळी जवळच असलेले रेल्वेचे गार्ड शंकर प्रसाद यांनी या महिलेच्या मदतीसाठी ब्रेक दाबून ट्रेन थांबवली. धुपगुडी स्टेशनजवळ ट्रेन थांबल्यानंतर एका स्थानिक डॉक्टराच्या मदतीने बाळाची नाळ वेगळी करण्यात आली. या सर्व गडबडीत ट्रेन एक तास लेट झाली.  

Web Title: Three Idiots have delivered the woman's delivery on the moving train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.