‘स्वतंत्र विदर्भ’ला विरोध नाही - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 06:10 AM2018-03-07T06:10:17+5:302018-03-07T06:10:17+5:30

विदर्भातल्या जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे असेल तर माझा अथवा पक्षाचा त्याला विरोध नाही. पूर्वीपासून माझी हीच भूमिका आहे. मी ती मांडत आलो आहे. पुण्यातील मुलाखतीत या भूमिकेचा मी पुनरुच्चार केल्याने विदर्भातले काही मित्र अस्वस्थ झाल्याचे वाचनात आले.

 There is no opposition to 'Independent Vidarbha' - Sharad Pawar | ‘स्वतंत्र विदर्भ’ला विरोध नाही - शरद पवार

‘स्वतंत्र विदर्भ’ला विरोध नाही - शरद पवार

Next

- सुरेश भटेवरा
नवी दिल्ली - विदर्भातल्या जनतेला स्वतंत्र विदर्भ राज्य हवे असेल तर माझा अथवा पक्षाचा त्याला विरोध नाही. पूर्वीपासून माझी हीच भूमिका आहे. मी ती मांडत आलो आहे. पुण्यातील मुलाखतीत या भूमिकेचा मी पुनरुच्चार केल्याने विदर्भातले काही मित्र अस्वस्थ झाल्याचे वाचनात आले. त्यामुळे पुन्हा हा खुलासा करावा लागतो आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ‘लोकमत’कडे आपली भूमिका मांडली.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरकर आहेत. पूर्वी विधानसभेत व बाहेरही फडणवीसांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी आग्रहीपणे अनेकदा मांडली. भाजपाच्या जाहीरनाम्यातही स्वतंत्र विदर्भाचा स्पष्ट उल्लेख आहे. सध्या महाराष्ट्रात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे. आता स्वतंत्र विदर्भासाठी मुख्यमंत्री फडणवीस खरोखर आग्रही असते तर ते थांबले असते काय, असा सवाल त्यांनी केला. स्वतंत्र विदर्भासाठी परिस्थिती पूर्णत: अनुकूल आहे, मग त्यांना अडवले कोणी? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून फडणवीसांनी एकदाही स्वतंत्र विदर्भाचा पुनरुच्चार केला नाही. पंतप्रधानांसह कोणाशीही त्यांनी चर्चा केल्याचेही ऐकीवात नाही. स्वतंत्र विदर्भासाठी तेथील लोक खरोखर आग्रही असते तर मुख्यमंत्री फडणवीस अथवा जाहीरनाम्यात वचन देणाºया भाजपाने मौन पाळले असते काय, असा सवाल त्यांनी केला.

Web Title:  There is no opposition to 'Independent Vidarbha' - Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.