Punjab Election 2022: WWE च्या रिंगणातून आता राजकारणात; ग्रेट खलीचा भाजपमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 02:31 PM2022-02-10T14:31:33+5:302022-02-10T14:31:52+5:30

Punjab Election 2022 The Greate Khali: ग्रेट खली उर्फ दलिप राणा यानं निवडणुकीपूर्वीच केला भाजपमध्ये प्रवेश.

the great khali aka dalip singh rana join bjp for the punjab assembly election 2022 actress mahi gill joined earlier | Punjab Election 2022: WWE च्या रिंगणातून आता राजकारणात; ग्रेट खलीचा भाजपमध्ये प्रवेश

Punjab Election 2022: WWE च्या रिंगणातून आता राजकारणात; ग्रेट खलीचा भाजपमध्ये प्रवेश

Next

Punjab Election 2022 The Greate Khali: पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे. WWE सारख्या इंटरनॅशनल फाईटद्वारे आपली ओळख निर्माण करणारा उमटवणारा ग्रेट खली ​(The Great Khali) उर्फ ​दलिप सिंग राणा यानं  भाजपमध्ये प्रवेश केला. दिलिप सिंग राणा यानं यापूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचारातही भाग घेतला होता.

दलिप सिंह राणा यानं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अलीकडच्या काळात अनेक दिग्गजांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबी अभिनेत्री माही गिलने या आठवड्याच्या सुरुवातीला भाजपमध्ये प्रवेश केला होता. दलिप सिंग राणा हे आतापर्यंत WWF मध्ये भारतातील सर्वात मोठं नाव आहे. दलिप सिंग राणा उर्फ ​​द ग्रेट खलीने या खेळात असताना सर्व प्रमुख चॅम्पियनशिप जिंकल्या. गेल्या काही काळापासून तो डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणापासून लांब आहे. 


"भाजपचं धोरण भारताची प्रगती करण्याचं आहे. यापासूनच प्रभावित होत मी भाजपत सामील होण्याचा निर्णय घेतला. भाजपा माझ्यावर जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन," अशी प्रतिक्रिया त्यानं यावेळी दिली.

यापूर्वीही केलाय प्रचार
दलिप सिंग राणा याआधीही राजकारणात दिसला आहे. २०१७ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत दलिप सिंग राणा यानं आम आदमी पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर तो आम आदमी पक्षात सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. दलिप सिंग राणानं डब्लूडब्ल्यूईमध्ये जाण्यासाठी पोलिसाची नोकरी सोडली होती. तसंच त्यानं बॉलिवूडमध्येही नशीब आजमावलं आहे.

Web Title: the great khali aka dalip singh rana join bjp for the punjab assembly election 2022 actress mahi gill joined earlier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.