सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 05:44 AM2024-05-06T05:44:54+5:302024-05-06T05:45:03+5:30

सरन्यायाधीशांनी एका छोट्याशा चुकीसाठी शाळेत छडी खाल्ल्याची आठवण सांगितली. 

The Chief Justice was punished; A self-told story dy chandrachud | सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनीही शालेय जीवनात क्षुल्लक चुकीवरून शिक्षकांची छडी खाल्ल्याचा अनुभव शेअर केला आहे.
काठमांडू येथे नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या बालन्यायविषयक राष्ट्रीय परिसंवादात बोलताना सरन्यायाधीशांनी एका छोट्याशा चुकीसाठी शाळेत छडी खाल्ल्याची आठवण सांगितली. 

‘तुम्ही मुलांशी कसे वागता याचा त्यांच्या मनावर त्यांच्या आयुष्यभर खोलवर परिणाम होतो. शाळेतील तो दिवस मी कधीच विसरणार नाही. जेव्हा माझ्या हातावर छडी मारली गेली, तेव्हा मी गुन्हेगार नव्हतो. मी कलाकुसर शिकत होतो आणि प्रात्यक्षिकसाठी योग्य आकाराच्या सुया आणल्या नव्हत्या, एवढाच काय तो माझा गुन्हा होता,’ असे ते म्हणाले. सरन्यायाधीश तेव्हा इयत्ता पाचवीमध्ये होते. ‘मी पालकांना शिक्षा झाल्याचे सांगू शकलो नाही. १० दिवस उजवा हात लपवत फिरत होतो. शारीरिक जखम बरी झाली; पण तिने मनावर कायमचा ठसा उमटवला, असे सरन्यायाधीश म्हणाले.

Web Title: The Chief Justice was punished; A self-told story dy chandrachud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.