Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 09:39 AM2023-12-01T09:39:19+5:302023-12-01T09:51:02+5:30

अनेक एक्झिट पोलमध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुमत मिळाल्यास काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करू शकते.

telangana assembly election 2023 exit polls shows congress get lead in telangana preparation to send mlas to bengaluru | Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

Telangana Election 2023 : तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळणार? आमदारांना बंगळुरूला पाठवण्याची तयारी

तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० नोव्हेंबरला मतदान झाले. याचा निकाल आता ३ डिसेंबरला जाहीर होणार आहे. दरम्यान, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसलातेलंगणात स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. असे असतानाही काँग्रेस हायकमांड अलर्ट मोडमध्ये आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, काँग्रेस तेलंगणात निवडून आलेले आपले आमदार बंगळुरू किंवा इतर कोणत्याही शहरात पाठवण्याचा विचार करत आहे, जेणेकरून घोडेबाजार टाळता येईल. 

२०१४ मध्ये तेलंगणा राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून याठिकाणी बीआरएसची सत्ता आहे. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी यांना राज्यात काँग्रेसच्या विजयाचा विश्वास आहे. मात्र, आमदारांना सध्या इतर ठिकाणी हलवण्याचा पक्षाचा विचार नसून रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. या संदर्भात आणखी एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, राज्यात काँग्रेसला जवळपास ७० जागा मिळाल्या आल्या नाहीत, तर आमदारांना बंगळुरू किंवा इतर कोणत्याही शहरात पाठवण्याचा प्रस्ताव आहे. अशा परिस्थितीत या लोकांना इथल्या हॉटेल किंवा रिसॉर्टमध्येही राहता येईल. 

तेलंगणा विधानसभेत एकूण ११९ जागा आहेत. त्याचबरोबर, सरकार स्थापन करण्यासाठी ६० जागांची आवश्यकता आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये राज्यात काँग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बहुमत मिळाल्यास काँग्रेस राज्यात सरकार स्थापन करू शकते. त्यामुळे विजयानंतर आमदारांना कुठल्यातरी गुप्त ठिकाणी पाठवले जाऊ शकते. तसेच, यामध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे म्हटले जात आहे. 

डीके शिवकुमार बजावणार महत्त्वाची भूमिका 
याआधीही डीके शिवकुमार यांनी आमदारांना शिफ्ट करण्याची भूमिका बजावली आहे. कर्नाटकमध्ये २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत फ्लोर टेस्ट दरम्यान, काँग्रेस आणि जनता दल (एस) च्या आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले होते. इंडिया टीव्ही सीएनएक्सनुसार, तेलंगणात काँग्रेसला ६३-७९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर बीआरएसला ३१-४७, भाजपला २-४ आणि एमआयएमआयएमला ५-७ जागा मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: telangana assembly election 2023 exit polls shows congress get lead in telangana preparation to send mlas to bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.