तारसा...

By Admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:06+5:302015-02-14T23:52:06+5:30

तहसील कार्यालयातील घाणीला जबाबदार कोण?

Tarsa ... | तारसा...

तारसा...

googlenewsNext
सील कार्यालयातील घाणीला जबाबदार कोण?
मौदा येथील प्रकार : प्रशासनाचे दुर्लक्ष, स्वच्छतेचा अभाव
शुभम गिरडकर ० तारसा
औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने मौदा तालुका झपाट्याने विकसित होत आहे. प्रशासन व नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा समजले जाणारे तहसील कार्यालय विविध समस्यांनी ग्रस्त आहे. या कार्यालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने येथील घाणीला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
मौदा तहसील कार्यालयाची २ मे १९८२ ला स्थापना करण्यात आली. पूर्वी एका साध्या इमारतीत असलेल्या तहसील कार्यालयाचे वाढती लोकसंख्या व कामांचा व्याप पाहता सन २०१४ ला प्रशस्त इमारत उभारण्यात आली. परंतु वर्षभरातच स्वच्छतेचे वाभाडे निघाल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
तहसील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकास येथील घाणीचा प्रत्यय येतो. वरच्या माळ्यावर जाताना प्रत्येक कोपऱ्यात पान, खर्रा खाऊन थुंकल्याचे चित्र दृष्टीस पडते. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
शासनाच्या गुटखा बंदी कायद्याची येथे सर्रास पायमल्ली होत असल्याचे वास्तव बघावयास मिळते. मात्र याकडे तहसील प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे. तसेच तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीलगत अनेक पानठेले, टपऱ्या थाटल्या आहेत, याकडेही दुर्लक्षच आहे.
१ मे २०१३ रोजी येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय स्थापन करण्यात आले. सदर कार्यालयही सध्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत सुरू आहे. त्यामुळे मौदा व कामठी तालुक्यातील अनेक नागरिक विविध प्रशासकीय कामासाठी तहसील कार्यालयात दाखल होतात. परिणामी कार्यालयात गर्दीचे प्रमाण अधिकच असते.

Web Title: Tarsa ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.