वीकेण्डला सैर करा 'या' ठिकाणची... अवघ्या पाच हजारांत !

By ravalnath.patil | Published: August 3, 2017 04:52 PM2017-08-03T16:52:49+5:302017-08-03T23:11:06+5:30

ऑगस्ट महिना सुट्ट्यांचा सुकाळ घेऊन आलेला आहे. या महिन्यात एक नाही तर तीन लॉन्ग वीकेण्ड आहेत. 5,6,7 ऑगस्ट, 12,13,14,15 ऑगस्ट आणि 25, 26, 27 ऑगस्ट अशा सलग सार्वजनिक सु्ट्ट्या आल्याने अनेकांना या विकेण्डमध्ये सहलीचे नियोजन करता येऊ शकते.

Take a walk to Vecand 'this' place ... only five thousandths! | वीकेण्डला सैर करा 'या' ठिकाणची... अवघ्या पाच हजारांत !

वीकेण्डला सैर करा 'या' ठिकाणची... अवघ्या पाच हजारांत !

Next

मुंबई, दि. 3 -  ऑगस्ट महिना सुट्ट्यांचा सुकाळ घेऊन आलेला आहे. या महिन्यात एक नाही तर तीन लॉन्ग वीकेण्ड आहेत. 5,6,7 ऑगस्ट, 12,13,14,15 ऑगस्ट आणि 25, 26, 27 ऑगस्ट अशा सलग सार्वजनिक सु्ट्ट्या आल्याने अनेकांना या विकेण्डमध्ये सहलीचे नियोजन करता येऊ शकते. त्यामुळे या वीकेण्डमध्ये फिरण्याची आवड असणा-यांची सहल या ठिकाणी अवघ्या कमी खर्चात होऊ शकते. तसेच, भरपूर मजा सुद्धा घेता येऊ शकते. अशाच काही ठिकाणांची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, त्या ठिकाणचा राहण्याचा खर्च फक्त पाच हजार रुपये इतका आहे. 

1) मध्यप्रदेशातील बेतवा नदी किना-याजवळ ओरछा नावचे एक शाही शहर आहे. या ठिकाणी पावसाळ्यातील नयनरम्य दृष्य पाहता येईल. तसेच, हा परिसर येथील मंदिर आणि राजवाड्यांमुळे प्रसिद्ध आहे. या ठिकाणी दोन किंवा तीन दिवस राहायचे असेल तर तुम्हाला 4,500 रुपये मोजावे लागतील. याशिवाय तुम्ही ट्रॅव्हल पॅकेजमधून जात असाल, तर 3,500 रुपयांपर्यंत खर्च येईल. येथील राम राजा मंदिर, ओरछा किल्ला, जहांगिर महाल, चतुर्भज मंदिर आणि राजा महाल पाहण्यासारखा आहे. 

2) तुम्हाला जर डोंगराळ प्रदेशात भ्रमण करायची आवड असेल तर हिमाचल प्रदेशातील डलहौजी पर्यटनस्थळ तुम्हाला नक्कीच आवडेल. येथील नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखी आहे. या ठिकाणी रात्री थांबविण्याची सुद्धा सोय आहे. एका व्यक्तीमागे दोन ते तीन दिवसांचे पॅकेज पाच हजार रुपये आहे. तसेच डलहौजीच्या आजुबाजूचा परिसर सुद्धा सैर करण्यासारखा आहे. 

3)राजस्थानमधील सर्वाधिक सुंदर हिल स्टेशन आहे माऊंट आबू. या ठिकाणचे दिलवाडा मंदिर खूप प्रसिद्ध आहे. याठिकाणची ट्रीप करण्यासाठी जास्त मेहनत घेण्याची गरज नाही. कारण, याठिकाणी सुद्धा दोन रात्री तीन दिवस राहण्यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागणार आहे.

4)उत्तराखंडमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर हा देखील स्पॉट फिरण्यासाठी चांगला पर्याय आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर या ठिकाणी अनेकप्रकारची फुले पाहता येतील. या ठिकाणी दोन दिवस राहण्यासाठी 3500 रुपये लागणार आहेत. 

5)भारतातील स्कॉटलॅंड म्हणून प्रसिद्ध असलेले मेघालयमधील शिलॉंग सुद्धा कमी खर्चात होईल. या ठिकाणी अनेक धबधबे आहेत. तसेच, इथल्या नैसर्गिक सौंदर्यात आनंद घेऊ शकता. 

Web Title: Take a walk to Vecand 'this' place ... only five thousandths!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.