जखमींना मदत न करणारे पोलीस निलंबित; उत्तर प्रदेशातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:35 AM2018-01-21T00:35:19+5:302018-01-21T00:35:31+5:30

उत्तर प्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुले अपघातात जखमी झाल्यानंतरही त्यांना तसेच रस्त्यावर पडू देणा-या आणि त्यांना आपल्या रुग्णालयात दाखल न करण्यासाठी आपले वाहन न देणाल्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

Suspended Police Suspending Wounded; Types of Uttar Pradesh | जखमींना मदत न करणारे पोलीस निलंबित; उत्तर प्रदेशातील प्रकार

जखमींना मदत न करणारे पोलीस निलंबित; उत्तर प्रदेशातील प्रकार

Next

मीरत : उत्तर प्रदेशच्या सहारणपूर जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुले अपघातात जखमी झाल्यानंतरही त्यांना तसेच रस्त्यावर पडू देणाºया आणि त्यांना आपल्या रुग्णालयात दाखल न करण्यासाठी आपले वाहन न देणाल्या तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.
ती दोन्ही मुले बराच काळ तिथे जखमी अवस्थेत पडून राहिले आणि नंतर ती रुग्णालयात नेताना मरण पावली. ही मुले गुरूवारी सहारणपूर जिल्ह्यात मोटरसायकलवरून जात असताना नियंत्रण सुटल्याने ती एका खांबावर जाऊ न आदळली आणि जवळच्या नाल्यात पडली. स्थानिक लोकांनी त्या दोघांना नाल्यातून बाहेर काढले आणि पोलिसांना फोनवरून अपघाताची माहिती दिली. ती मुले गंभीर जखमी झाली होती आणि त्यांना ताबडतोब रुग्णालयात उपचारांसाठी नेणे आवश्यक होते.
पण जखमी मुलांना आमच्या वाहनातून नेल्यास त्यांच्या सांडलेल्या रक्ताने आमचे वाहन खराब होईल, असे उत्तर देत, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेण्यास नकार दिला. अखेर स्थानिक लोकांनीच एका टेम्पोमध्ये त्या दोघांना घातले आणि रुग्णालयात नेले. पण नेत असतानाच ती दोन्ही मुले मरण पावली.
हे वृत्त सहारणपूरमध्ये लोक संतापले. या प्रकाराची बातमी सर्वत्र पसरताच वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी त्याची गंभीर दखल घेत, पोलिसांच्या १00 क्रमांकावर उपस्थित असलेले हेड कॉन्स्टेबल इंद्रपाल सिंह, कॉन्स्टेबल पंकज कुमार व वाहनचालक मनोज कुमार यांना निलंबित केले.
पोलीस अधीक्षक प्रबल प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अर्पित खुराना व त्याचा मित्र सनी (दोघांचे वय १७) मोटारसायकलवरून घरी जात असताना बेरी बाग परिसरात मंगलनगर चौकात नियंत्रण सुटल्याने ती खांबाला जाऊन आदळून एका नाल्यात
पडली. (वृत्तसंस्था)

हा बेजबाबदारपणाच
ही दोन्ही मुले अल्पवयीन असताना, त्यांना पालकांनी मोटारसायकल चालवण्यास का दिली, याचीही चौकशी पोलीस करणार आहेत. अर्थात ती चौकशी होणार असली तरी तीन पोलिसांच्या निष्काळजी व बेजबाबदारपणाचे आपण समर्थन करीत नाही, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.

Web Title: Suspended Police Suspending Wounded; Types of Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस