श्रीनगरमधील चौकात वंदे मातरमच्या घोषणा देणा-या 'त्या' महिलेला सुरेश रैनाचा सलाम

By शिवराज यादव | Published: August 17, 2017 11:33 AM2017-08-17T11:33:09+5:302017-08-17T11:38:15+5:30

श्रीनगरमधील लाल चौकात एका महिलेने दहशत झुगारत जाहीरपणे वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या

Suresh Raina's salute to the 'woman' who announced the name of Vande Mataram in the square of Srinagar | श्रीनगरमधील चौकात वंदे मातरमच्या घोषणा देणा-या 'त्या' महिलेला सुरेश रैनाचा सलाम

श्रीनगरमधील चौकात वंदे मातरमच्या घोषणा देणा-या 'त्या' महिलेला सुरेश रैनाचा सलाम

Next

मुंबई, दि. 17 - एकीकडे भारता माता की जय बोलायचं की नाही यावरुन वाद-विवाद सुरु असताना श्रीनगरमधील लाल चौकात एका महिलेने दहशत झुगारत जाहीरपणे वंदे मातरमच्या घोषणा दिल्या होत्या. स्वातंत्र्यदिनानिनित्त आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करत धाडस करणा-या या महिलेचं भारतीय क्रिकेटर सुरेश रैनाने कौतुक केलं आहे. सुरेश रैनाने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत या महिलेला सलाम केला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुनीता अरोडा या महिलेने जम्मू-काश्मीरमध्ये लाल चौकात वंदे मातरम, भारतमाता की जय घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

आणखी वाचा
दहशत झुगारत तिने श्रीनगरमधील लाल चौकात दिल्या वंदे मातरमच्या घोषणा
भारतासोबत या देशांचाही असतो स्वातंत्र्य दिन
भारताच्या स्वातंत्र्यदिनाला न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंगला तिरंग्याचा साज


सुरेश रैनाने महिलेने घोषणा दिल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत कौतुक करताना सुनीता अरोडा खूपच धाडसी असून त्यांना माझा सलाम असंही रैनाने लिहिलं आहे. सुनीता अरोडा यांना लाल चौकात पोहोचण्यासाठी 20 चौक्या पार कराव्या लागल्या होत्या. आपण कशासाठी चाललो आहोत यहे उघड होऊ नये यासाठी त्यांनी राष्ट्रीय ध्वज पर्समध्ये लपवून नेला होता. 


देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना काश्मीरमधील श्रीनगर येथे मात्र या दिवशी तणावाचे वातावरण होते. फुटीरतावादी संघटना आणि दहशतवादी यांच्या धमक्यांमुळे येथील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या लाल चौक परिसरात राष्ट्रध्वज फडकावणेही सुरक्षा दलांसमोरील आव्हान ठरते. मात्र ही दहशत झुगारत सुनीता अरोडा यांनी लाल चौकात वंदे मातरम्, भारतमाता की जयच्या घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला. या महिलेने धैर्य दाखवत केलेल्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 

स्वातंत्र्य दिनी होणाऱ्या दहशतावादी कारवाया विचारात घेऊन लष्काराकडून काश्मीरमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येते. त्यात संवेदनशील समजल्या जाणाऱ्या श्रीनगरमधील लाल चौक परिसरात तर संचारबंदी लागू केली जाते. मात्र अशा परिस्थितीत सुनीता अरोडा यांनी तेथे वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. तसेच तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनाही अशा घोषणा देण्यासाठी त्या आवाहन करताना व्हिडीओत दिसत आहे. मात्र अघटित होऊ नये म्हणून  सुरक्षा दलांकडून त्या महिलेला तेथून बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागली.  

लाल चौक परिसरामध्ये फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांचे वर्चस्व आहे. त्यामुळे येथे नेहमीच तणावाची परिस्थिती असते. येथे 1948 साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकावला होता. त्यानंतर 1992 साली भाजपाचे तात्कालिन अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी येथे तिरंगा फडकवला होता.  

Web Title: Suresh Raina's salute to the 'woman' who announced the name of Vande Mataram in the square of Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.