दोन प्रौढांच्या विवाहात खापने हस्तक्षेप करणं बेकायदेशीर- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 12:01 PM2018-03-27T12:01:47+5:302018-03-27T12:11:43+5:30

खाप पंचायतींना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे.

supreme court decision on khap panchayat | दोन प्रौढांच्या विवाहात खापने हस्तक्षेप करणं बेकायदेशीर- सुप्रीम कोर्ट

दोन प्रौढांच्या विवाहात खापने हस्तक्षेप करणं बेकायदेशीर- सुप्रीम कोर्ट

Next

नवी दिल्ली- खाप पंचायतींना सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. दोन सज्ञान व्यक्तींमधील विवाहात खाप किंवा अन्य कोणत्याही संघटनेने हस्तक्षेप करणं बेकायदा ठरतं, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे. जर दोन सज्ञान व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय त्यांच्या मर्जीने घेतला असेल तर त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हंटलं. 

या प्रकरणावर जो पर्यंत केंद्र सरकार कायदा करत नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू राहणार असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं. शक्ति वाहिनी नावाच्या एका एनजीओने खाप पंचायतीविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. ऑनर किलिंग प्रकरणावर चाप बसविण्याचे सुप्रीम कोर्टाने केंद्र व राज्य सरकारला आदेश द्यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय समितीसमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षेखालील समितीने आज हा निर्णय दिला आहे.  
 

Web Title: supreme court decision on khap panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.