कडक सॅल्यूट! अपघातात हात-पाय गमावले पण हार नाही मानली; UPSC केली क्लिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 03:56 PM2024-04-11T15:56:09+5:302024-04-11T16:03:43+5:30

सूरज इतर मुलांसोबत हसत-खेळत अभ्यास करायचा, पण 2017 मध्ये झालेल्या अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.

success story mainpuri suraj handicapped cleared upsc exam first attempt | कडक सॅल्यूट! अपघातात हात-पाय गमावले पण हार नाही मानली; UPSC केली क्लिअर

फोटो - आजतक

UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र रात्रंदिवस तासनतास अभ्यास करूनही या परीक्षेचे तीन टप्पे पार करणं फार कठीण आहे. यासाठी उमेदवार कोचिंग, ट्यूशन इत्यादी सुविधांसह अभ्यास करतात, परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हिंमत आणि सहनशक्ती असणं आवश्यक आहे. मैनपुरीच्या सूरजने हे सिद्ध करून दाखवलं आहे.

सूरज इतर मुलांसोबत हसत-खेळत अभ्यास करायचा, पण 2017 मध्ये झालेल्या अपघाताने त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. 2017 मध्ये रेल्वे अपघातात सूरजला हात आणि पाय गमवावे लागले. सुरजला चार महिने प्रचंड वेदना होत राहिल्या आणि त्याच्यावर उपचार सुरूच होते. एवढा मोठा अपघात झाल्यानंतरही त्याने कधीच स्वतःला इतरांपेक्षा कमी समजलं नाही.

हात-पाय गमावल्यानंतरही सूरजचा धीर सुटला नाही आणि त्याने यूपीएससीची तयारी सुरू केली. त्याच्यात इतका उत्साह होता की त्याने ही अवघड परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास केली. घरची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली आणि काही वेळाने सूरजच्या एका भावाचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण कुटुंब दु:खी झाले होते मात्र सूरजने हिंमत हारली नाही आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून यश संपादन केलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूरजने यूपीएससी परीक्षेसाठी कुठूनही कोचिंग घेतलं नाही. घरीच स्वत: अभ्यास करून तो या ध्येयापर्यंत पोहोचला आहे. आपल्या आयुष्यातील भीषण सत्य त्याने स्वीकारलं आहे. या अवघड काळात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता अनेकांना सूरजकडून प्रेरणा मिळत आहे. 
 

Web Title: success story mainpuri suraj handicapped cleared upsc exam first attempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.