'भारतात मुस्लिमांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा सन्मान होतो', 'त्या' घटनेवरुन ओेवेसींची भाजपवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 03:20 PM2022-10-09T15:20:20+5:302022-10-09T15:20:47+5:30

गरबा कार्यक्रमावर दगडफेक केल्याप्रकरणी मुस्लीम तरुणांना पोलिसांनी खांबाला बांधून मारहाण केल्याची घटना घडली.

'Stray dogs are respected more than Muslims in India', Owesi criticizes BJP | 'भारतात मुस्लिमांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा सन्मान होतो', 'त्या' घटनेवरुन ओेवेसींची भाजपवर टीका

'भारतात मुस्लिमांपेक्षा जास्त भटक्या कुत्र्यांचा सन्मान होतो', 'त्या' घटनेवरुन ओेवेसींची भाजपवर टीका

googlenewsNext

गरबा कार्यक्रमावर दगडफेक केल्याप्रकरणी काही मुस्लीम तरुणांना पोलिसांनी खांबाला बांधून सर्व लोकांसमोर लाठीने मारहाण केल्याची घटना गुजरातमध्ये घडली होती. त्या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी त्या घटनेवर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनीही त्या घटनेवर संताप व्यक्त केला आणि भाजप सरकारवर टीका केली.

काय म्हणाले ओवेसी?

गुजरातच्या भाजप सरकारवर हल्लाबोल करताना ओवेसी म्हणाले की, 'भारतात रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा सन्मान केला जातो, परंतु मुस्लिमांचा नाही. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे, तिथे तिथे मुस्लिम लोक खुल्या तुरुंगात राहत असल्यासारखे दिसतात. गुजरातमध्ये नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमात दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी मुस्लिम तरुणांना खांबाला बांधून 300-400 लोकांसमोर लाठीने मारहाण केली. मुस्लिम तरुणांना मारहाण करताना लोक घोषणाबाजीही करत होते.'

नेमकं काय झालं?
काही दिवसांपूर्वी गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील उंडेला गावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित गरबा कार्यक्रमावर मुस्लिम समाजातील काही लोकांनी दगडफेक केली होती, ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह 7 जण जखमी झाले होते. पोलिसांनी सांगितल्यानुसार, हल्लेखोरांनी मशिदीजवळ आयोजित गरबा कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. दगडफेकीच्या आरोपाखाली पोलिसांनी 13 जणांना अटक केली होती. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस तीन आरोपींना खांबाला बांधून बेदम मारहाण करताना दिसत आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

45 जणांची ओळख पटली
या घटनेत नोंदवलेल्या एफआयआरनुसार, महिलांसह सुमारे 150 लोकांच्या जमावाने गरबा करत असलेल्या लोकांवर दगडफेक केली. यापैकी 45 जणांची ओळख पटली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर सभा आणि जाणूनबुजून दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 'Stray dogs are respected more than Muslims in India', Owesi criticizes BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.