श्री श्री रविशंकर यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 01:46 PM2017-11-15T13:46:25+5:302017-11-15T13:50:37+5:30

राम मंदिराच्या मुद्यावर मध्यस्थी करत असलेले आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. येथील मुख्यमंत्री बंगल्यावर या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली.

Sri Sri Ravi Shankar has met Yogi Adityanath, discusses Ram temple issue? | श्री श्री रविशंकर यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा?

श्री श्री रविशंकर यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट, राम मंदिराच्या मुद्द्यावर चर्चा?

Next
ठळक मुद्देश्री श्री रविशंकर यांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट जवळपास अर्धा तास चर्चाराम मंदिराच्या मुद्यावर चर्चा?

लखनऊ : राम मंदिराच्या मुद्यावर मध्यस्थी करत असलेले आधात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी बुधवारी सकाळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. येथील मुख्यमंत्री बंगल्यावर या दोघांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. तसेच, या चर्चेनंतर श्री श्री रविशंकर उद्या (दि.16) अयोध्या येथे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतल्यानंतर अजून काही लोकांशी याबाबत श्री श्री रविशंकर चर्चा करणार आहेत. यामध्ये दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा, राष्ट्रीय मुस्लीम मंच, शिवसेना, हिंदूमहासभा याशिवाय विनय कटियार यांची सुद्धा भेट घेण्याचे त्यांनी योजिले आहे.




दरम्यान, यावर शिया वल्फ बोर्डमधून वेगळा सूर उमटत असल्याचे दिसून येत आहे. या विषयावर आम्ही ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल बोर्ड लॉ सोबत आहोत, असे शिया वल्फ बोर्डचे प्रवक्ते यसूब अब्बास यांनी म्हटले आहे. तर, शिया वल्फ बोर्डचे प्रमुख वसीम रिजवी यांची भूमिका वेगळीच आहे.   


या चार मुद्द्यांवर फोकस - 
-  बाबरी मस्जिद आणि राम मंदिर  या मुद्द्यांवर वेगवेगळ्या पक्षांशी चर्चा करण्यामागे काय रोडमॅप असेल?
- वाद सोडविण्यासाठी कोणाला सामील करणार?
- चर्चेनंतर राज्य आणि केंद्र सरकार यांची काय भूमिका असणार?
- अंतिम टप्प्यात काय निर्णय होणार आणि कोर्टासमोर काय सादर करणार? 

Web Title: Sri Sri Ravi Shankar has met Yogi Adityanath, discusses Ram temple issue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.