कुमारस्वामींनी केलेला विकास दाखवा, सिद्धरामय्या समर्थक भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 12:10 PM2019-01-28T12:10:09+5:302019-01-28T12:11:15+5:30

कर्नाटकातील राजकीय नाट्याला पुन्हा एकदा नवं वळण मिळालं आहे.

siddaramaiah camp blast over karnataka cm hd kumaraswamy says no development till date | कुमारस्वामींनी केलेला विकास दाखवा, सिद्धरामय्या समर्थक भडकले

कुमारस्वामींनी केलेला विकास दाखवा, सिद्धरामय्या समर्थक भडकले

Next
ठळक मुद्देकर्नाटकातील राजकीय नाट्याला पुन्हा एकदा नवं वळण मिळालं आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या सिद्धरामय्या यांच्या समर्थक आमदारांनी कुमारस्वामींवर जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसचे आमदार म्हणाले, आम्ही आताही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो.

बंगळुरू- कर्नाटकातील राजकीय नाट्याला पुन्हा एकदा नवं वळण मिळालं आहे. माजी मुख्यमंत्री राहिलेल्या सिद्धरामय्या यांच्या समर्थक आमदारांनी कुमारस्वामींवर जोरदार हल्ला चढवला आहे. सिद्धरामय्या समर्थकांनी रविवारी एका कार्यक्रमात त्यांचं स्वागत केलं. या दरम्यान ते काँग्रेसचे मंत्री सी पुत्तरंगा शेट्टी यांच्याबरोबर होते. त्यावेळी काँग्रेसचे आमदार म्हणाले, आम्ही आताही सिद्धरामय्या यांनाच मुख्यमंत्री मानतो. कर्नाटक सरकारवर टीका करत काँग्रेस आमदार एसटी सोमशेखर म्हणाले, आघाडीच्या सरकारला 7 महिने झाले आहेत, परंतु अद्यापही विकासाच्या नावावर काहीही केलेलं नाही. जर सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळासाठी आणखी पाच वर्षं मिळाली असती तरी त्यांनी खरा विकास कसा करतात हे दाखवून दिलं असतं.

फक्त सिद्धरामय्याच आमचे मुख्यमंत्री
मला आणखी पाच वर्षं मिळाली असती तर मी विकासाची कामं पूर्णत्वास नेली असती, असंही सिद्धरामय्या म्हणाले आहेत. माझ्या विरोधकांनी मला पराभूत केलं. त्यांनी माझ्याविरोधात मला बदनाम करण्यासाठी आंदोलन केलं. माझ्या पराभवाची योजना तयार केली. माजी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा करत सामाजिक कल्याण मंत्री सी. पुत्तरंगा शेट्टी म्हणाले, तुम्हीही काही म्हणा, फक्त सिद्धरामय्या माझ्यासाठी मुख्यमंत्री आहेत.



मी त्या पदावर इतर कोणाचीही कल्पना करू शकत नाही. त्यावर जेडीएसचे अध्यक्ष एचडी देवेगौडा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आघाडीच्या सरकारांमध्ये विचारांचे मतभेद असू शकतात. परंतु त्यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. त्यामुळे मी यावर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. जेव्हा तुम्ही आघाडी सरकारमध्ये असता, त्यावेळी या गोष्टी सहन कराव्या लागतात, असंही देवेगौडा म्हणाले आहेत. 



 

Web Title: siddaramaiah camp blast over karnataka cm hd kumaraswamy says no development till date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.