पाचवीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अवमान, शिवसंघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 11:12 AM2018-07-12T11:12:09+5:302018-07-12T11:14:22+5:30

शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला असून यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

Shivaji Maharaj's contempt of the fifth book, the aggression of the Shiva Sangh | पाचवीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अवमान, शिवसंघटना आक्रमक

पाचवीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा अवमान, शिवसंघटना आक्रमक

अमरावती - उत्तर प्रदेशातील मधुबन प्रकाशनतर्फे प्रकाशित केलेल्या इयत्ता पाचवीच्या हिंदी पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. शिवाजी हे शूर होते, पण बुद्धीमान नव्हते, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला असून यावर मराठा संघटनांनी आक्षेप घेतला आहे. याप्रकरणी मधुबन प्रकाशन आणि लेखिका डॉ. अनुराधा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही मराठा संघटनांनी केली आहे. 

हिंदी भाषेतील व्याकरण वाटिका-5 या पुस्तकातील 'रचनात्मक गतविधिया' या धड्यातील परिच्छेद चार आणि पाचमध्ये शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक मजकूर प्रकाशित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक बाजारात आणि ऑनलाईन स्वरुपात उपबल्ध आहे. त्यामुळे मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडने यावर आक्षेप घेत लेखिका आणि प्रकाशकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचे म्हटले आहे. याबाबत सचिन चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खोटा आणि अवमानकारक मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शिवाजी महाराजाबद्दल नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते, असे तक्रारीत म्हटले आहे. शिवरायांची ओळख धाडसी, पराक्रमी आणि शूरवीर अशी आहे. मात्र, लेखिकेने जाणूनबुजून त्यांच्याविषयी लेखिकेने चुकीच्या आणि आकसपूर्ण मनोवृत्तीने हे लिखाण केल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. दरम्यान, हे पुस्तक इंटरनेटवरुन हटविण्यात यावे. तसेच शालेय अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश करु नये अशी मागणीही संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे. 

Web Title: Shivaji Maharaj's contempt of the fifth book, the aggression of the Shiva Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.