'वंदे मातरम्' चा अपमान केल्याचा आरोप, तेजस्वी यादवांवर देशद्रोहाचा गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 04:07 PM2017-08-17T16:07:39+5:302017-08-17T16:27:24+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव एका नव्या अडचणीत

sedition case filed against Tejashwi Yadav | 'वंदे मातरम्' चा अपमान केल्याचा आरोप, तेजस्वी यादवांवर देशद्रोहाचा गुन्हा 

'वंदे मातरम्' चा अपमान केल्याचा आरोप, तेजस्वी यादवांवर देशद्रोहाचा गुन्हा 

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव एका नव्या अडचणीत 'वंदे मातरम्' चा अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप

दरभंगा, दि. 17 - राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव एका नव्या अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. यावेळी 'वंदे मातरम्' चा अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दरभंगामध्ये त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तेजस्वी यादव यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये 'वंदे मातरम्' चा अपमान  झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 13 ऑगस्ट रोजी उमाशंकर सिंग नावाच्या व्यक्तीच्या  एका ट्विटला रिट्विट करताना तेजस्वी यांनी 'सही कहा इनका "वंदे मातरम्" = बंदे मारते हैं हम''असं बोचरं ट्विट केलं होतं. 


जदयूचे तांत्रिक विभागाचे जिल्हाध्यक्ष इकबाल अन्सारी यांनी सीजीएम कोर्टात तेजस्वी यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली आहे. तेजस्वी यांच्या ट्विटमुळे राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. तेजस्वी यांच्या ट्विटवर प्रकर टीका झाली तरीही त्यांनी आपलं ट्विट हटवलं नाही, त्यामुळे अखेर न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याचं अन्सारी म्हणाले. 

नितीश कुमार यांनी साथ सोडल्यापासून तेजस्वी राज्यात टप्प्याटप्प्याने जनादेश अपमान यात्रा करत आहेत. बुधवारी भागलपूर येथे जनसभेची परवानगी न मिळाल्याने त्यांनी आपल्या समर्थकांसह निदर्शनं केली.  

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाची साथ दिल्यापासून तेजस्वी यादव भाजपा आणि नितीश सरकारवर हल्लाबोल करत आहेत. 

आणखी वाचा - (मोदी कपडे धुण्यापुरतेच भारतात येतात - तेजस्वी यादव)

Web Title: sedition case filed against Tejashwi Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.