भाजपला धक्का देण्याची सप-बसपला पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:02 AM2018-03-18T00:02:37+5:302018-03-18T00:02:37+5:30

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव केलेल्या समाजवादी पक्ष (सप) व बहुजन समाज पक्ष (बसप) यांच्या मैत्रीला भाजपला आपल्या ताकदीचे दर्शन घडवण्याची आणखी एक संधी येत्या पाच महिन्यांत मिळणार आहे.

Sap-BSP re-opportunity to push BJP to chance again | भाजपला धक्का देण्याची सप-बसपला पुन्हा संधी

भाजपला धक्का देण्याची सप-बसपला पुन्हा संधी

Next

लखनौ : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव केलेल्या समाजवादी पक्ष (सप) व बहुजन समाज पक्ष (बसप) यांच्या मैत्रीला भाजपला आपल्या ताकदीचे दर्शन घडवण्याची आणखी एक संधी येत्या पाच महिन्यांत मिळणार आहे.
कैराना व नूरपूर मतदार संघात या पोटनिवडणुका होणार आहेत. भाजपचे खासदार हुकुम सिंह आणि आमदार लोकेंद्र सिंह यांच्या निधनामुळे या जागा रिकाम्या झाल्या आहेत. सप व बसपतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षी होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीत सप-बसपची युती होणे शक्य आहे की नाही याची रूपरेषा आगामी पोटनिवडणुकीत निश्चित होऊ शकेल.
बसपने गोरखपूर व फुलपूरची पोटनिवडणूकही लढवली नव्हती. कैराना पोटनिवडणुकीतील विजयी उमेदवाराला अत्यंत अल्प कालावधी मिळणार असल्याने तेथे बसपचा उमेदवार मायावती उभा करणार नाहीत. परंतु, नूरपूर मतदार संघातील विजयी उमेदवाराला तीनपेक्षा जास्त वर्षांचा कालावधी आमदार म्हणून मिळणार आहे. राज्यसभेसाठी बसपचा उमेदवार सपाच्या नेतृत्वाखालील एकत्रित विरोधकांच्या पाठिंब्याने विजयी झाला तर मायावती कैराना पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

कैरानात जाटांचे वर्चस्व
कैराना मतदारसंघात जाटांचे वर्चस्व असून तो राष्ट्रीय लोकदलचे नेते अजित सिंह यांचा २००९ पर्यंत बालेकिल्ला होता. परंतु २००९ च्या निवडणुकीत बसपच्या तब्बस्सुम बेगम यांनी हुकुम सिंह यांचा पराभव केला. मात्र २०१४ च्या नरेंद्र मोदी लाटेत बसपचा पराभव झाला. कैरानातून हिंदूंचे इतरत्र स्थलांतराचा दावा करणारे हुकुमसिंह विजयी झाले.

Web Title: Sap-BSP re-opportunity to push BJP to chance again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.