Sanjay Kapoor said, Sridevi did not have heart problem | श्रीदेवी यांना नव्हता हृदयविकाराचा त्रास, संजय कपूर यांनी दिली माहिती
श्रीदेवी यांना नव्हता हृदयविकाराचा त्रास, संजय कपूर यांनी दिली माहिती

मुंबई - श्रीदेवी यांच्या अकाली निधनामुळे कपूर परिवाराला धक्का बसला आहे. श्रीदेवी यांचे धाकटे दीर संजय कपूर यांनी श्रीदेवींच्या निधनामुळे आपले संपूर्ण कुटुंब दु:खात असून, श्रीदेवी यांना हृदयविकाराचा त्रास कधीच जाणवला नव्हता अशी माहिती दिली आहे. बॉलीवूडमधील स्टार अभिनेत्रींपैकी एक असलेल्या श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री निधन झाले होते.
संजय कपूर श्रीदेवींच्या मृत्यूबाबत माहिती देताना म्हणाले की, मृत्यू झाला तेव्हा श्रीदेवी ह्या दुबईमधील  हॉटेलच्या खोलीत होत्या. त्यांच्या मृत्युमुळे आहम्हाल धक्का बसला आहे. त्यांना हृदयाशी संबंधित कुठल्याहील प्रकारचे आजारपण नव्हते."
श्रीदेवी  दुबईमध्ये मोहित मारवाह याच्या विवाहासाठी गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती बोनी कपूर आणि छोटी मुलगी खुशी होती.  तर त्यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर चित्रिकरणामध्ये व्यस्त असल्याने ती मुंबईतच होती. 
'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे बिरूद अभिमानानं मिरवणाऱ्या श्रीदेवी शेवटपर्यंत स्टार राहिल्या आणि यापुढेही राहणार आहेत. त्यांच्याबद्दलच्या 10 प्रमुख गोष्टी... 

- श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 ला तामिळनाडूत झाला होता. त्यांचे वडील वकील होते. श्रीदेवींना एक बहीण आणि दोन सावत्र भाऊ होते.
- 1996 मध्ये श्रीदेवी यांनी निर्माता-दिग्दर्शक बॉनी कपूर यांच्याही लगीनगाठ बांधली. जान्हवी आणि खुशी या त्यांच्या दोन कन्या. 
- बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी श्रीदेवींनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 
- श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट 'सोलवां सावन' होता. 1979 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. 
- 1989 मध्ये 'चालबाज' या चित्रपटात श्रीदेवी यांनी डबल रोल साकारला होता. या अभिनयाबद्दल त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
- 1991 मध्ये 'यशराज'च्या 'लम्हे'मध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका साकारली आणि दुसऱ्या फिल्मफेअरची दुसरी बाहुली पटकावली.
- 1996 मध्ये बोनी यांच्यासह विवाहबंधनात अडल्यानंतर चित्रपटापासून दूर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. 
- 2012 मध्ये गौरी शिंदे यांच्या इंग्लिश विंग्लिश  या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं. 16 वर्ष चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही या चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरावरुन कौतुक झालं. 
- सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई , जाग उठा इंसान,  हिम्मतवाला, सरफरोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नजराना, कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर कानूनी, हीर रांझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चांद का टुकड़ा, गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम हे श्रीदेवी यांचे काही चित्रपट. 
अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून 2013 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  
 


Web Title: Sanjay Kapoor said, Sridevi did not have heart problem
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.