Sabarimala Temple : १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिरात येऊ नये, मुख्य पुजाऱ्यांची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 10:26 PM2018-10-18T22:26:10+5:302018-10-18T22:26:44+5:30

सबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी भाविकांना आवाहन केले आहे.

Sabarimala Temple: Women in the age group of 10 to 50 years should not be present in the temple, request of main priests | Sabarimala Temple : १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिरात येऊ नये, मुख्य पुजाऱ्यांची विनंती

Sabarimala Temple : १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिरात येऊ नये, मुख्य पुजाऱ्यांची विनंती

Next

तिरुवनंतपूरम - सबरीमाला मंदिरामध्ये सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही केरळमध्ये वाद सुरू आहे. यादरम्यान, सबरीमाला मंदिराचे मुख्य पुजारी कंदारू राजीवारू यांनी १० ते ५० वयोगटातील महिलांनी मंदिराच्या सन्निधानममध्ये येऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास पूजा बंद करण्याचा पुजाऱ्यांचा विचार असल्याच्या वृत्ताचे त्यांनी खंडन केले आहे. 

"अयप्पाची मासिक पूजा आणि अनुष्ठान करणे हे आमचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. आम्ही आमची परंपरा तोडणार नाही,"असे राजीवारू यांनी सांगितले. महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यास पुजाऱ्यांकडून मंदिराचे दरवाजे बंद करून पूजा थांबवण्यात येईल, असे वृत्त प्रसारित झाले होते. मात्र राजीवारू यांनी हे वृत्त फेटाळले आहे. ''आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो. पण महिला भक्तांनी मंदिरातील परंपरा आणि इतर भक्तांच्या भावनांचा आदर करून मंदिरात येऊ नये, असे आवाहन राजीवारू यांनी केले.  

दरम्यान, केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरात महिला प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात सध्या तणावाचे वातावरण सुरु आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, येथील निल्लकल, पंपा, एल्वाकुलम, सन्निधनम या भागात कलम 144 नुसार जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 

  शबरीमाला संरक्षण समितीने आज गुरूवार 12 तासांच्या बंदची घोषणा केली आहे. भाजपा, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि अन्य स्थानिक संघटनांनी या बंदला समर्थन दिले आहे. काँग्रेस या बंदमध्ये सहभागी होणार नाही मात्र, राज्यात विरोध प्रदर्शन करणार आहे. महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिर महिनाभराच्या धार्मिक विधींसाठी बुधवारी सायंकाळी प्रथमच प्रचंड तणावाच्या वातावरणात उघडले.  मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधकरणाऱ्यांनी बुधवार सकाळपासूनच मंदिर परिसरात जोरदार निदर्शने केली होती.

Web Title: Sabarimala Temple: Women in the age group of 10 to 50 years should not be present in the temple, request of main priests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.