Reservation, electricity, petrol, diesel cheaper to potsters, assured of cheapness through Congress manifesto | पाटीदारांना आरक्षण, वीज, पेट्रोल, डिझेल स्वस्त, काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून स्वस्ताईचे आश्वासन

अहमदाबाद - गुजरात  विधानसभा निवडणुकीचे मतदान आता काही दिवसांवर आले आहे. गुजरातमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काँग्रेसने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, या जाहीरनाम्यामधून पाटीदारांना आणि सवर्णांना ईबीसी आणि आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच 49 टक्के आरक्षणाची मर्यादा बदलण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. त्याबरोबरच राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास वीज, पेट्रोल आणि डिझेल स्वस्तात देण्याचे आश्वासही देण्यात आले आहे.  
गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनी आज काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी जनतेच्या समाधानाचा आलेख हा जाहीरनाम्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जाहीरनाम्यामधून राज्यात अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी किमान हमीभाव देण्याचा उल्लेखही जाहीरनाम्यात आहे. तसेच पेट्रोल, डिझेल आणि वीज स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.  
दरम्यान,  गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्याचे दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये दिसले आहे. या पोलममध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात 22 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच आणि भाजपात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसत असून. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखण्याची शक्यता असून, भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  
एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या  आज जाहीर झालेल्या फायनल ओपिनियन पोलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीत अनेक नवी समीकरणे दिसून आली आहे. तसेच पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये सत्ताधारी भाजपाची पिछेहाट होताना दिसत आहे. भाजपाची मतांची टक्केवारी मोठ्या प्रमाणावर घटून केवळ 43 टक्केच मते भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसलाही 43 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. या मतांचे जागांमध्ये रुपांतर करायचे झाल्यास भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळू शकतात. जागांची सरासरी काढल्यास भाजपाला 95, काँग्रेसला 82 आणि इतरांना 5 जागा मिळू शकतात.
 


Web Title: Reservation, electricity, petrol, diesel cheaper to potsters, assured of cheapness through Congress manifesto
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.