बंडखोरी हा जगण्याचा अविभाज्य भागच! संमेलनात रंगला परिसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:37 AM2018-02-18T00:37:35+5:302018-02-18T00:37:42+5:30

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.

Rebellion is an integral part of life! Rangala seminar in the meeting | बंडखोरी हा जगण्याचा अविभाज्य भागच! संमेलनात रंगला परिसंवाद

बंडखोरी हा जगण्याचा अविभाज्य भागच! संमेलनात रंगला परिसंवाद

Next

- स्नेहा मोरे

महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्यनगरी, बडोदे : समाजाचा विकास आणि बंडखोरी या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चुकीच्या चालीरीती रोखण्यासाठी प्रत्येक पातळीवर विद्रोह आणि बंडखोरी गरजेची आहे. बंडखोरी हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यशवंत पाठक यांनी केले.
अ. भा. मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी संत कवयित्रींची बंडखोरी आणि स्त्रीवाद’ विषयावर शनिवारी परिसंवाद झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाठक बोलत होते. विद्यासगर पाटांगणकर, रेखा नार्वेकर, सुनील शिनखेडे, डॉ. मृणालिनी कामत, डॉ. रेखा घिये-दंडिगे यांचा सहभाग होता. डॉ. पाठक म्हणाले,अभिव्यक्तीचे श्रेष्ठत्व जगण्याला कायम आधार देत असते. हेच श्रेष्ठत्व संत कवयित्रींच्या लेखनात दिसून येते. त्यामुळे वर्षानुवर्षे लोटली तरी त्यांचे साहित्य काळाला अनुरूप ठरते.

आध्यात्मिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाता यावे म्हणून संत कवयित्रींनी हाती लेखणी घेतली. विषमतताविरहित समाजाचे
स्वप्न पाहणारा समाज
म्हणजे स्त्रीवाद होय अशी मांडणी डॉ. मृणालिनी कामत यांनी केली.
रेखा नार्वेकर म्हणाल्या, अध्यात्म आणि काव्य यांचा समन्वय साधून संत कवयित्रींनी लिखाण केले. मुक्ताबाईने तर मी- मी म्हणणाºया पुरुषांचे गर्वहरण केले होते.
पाटांगणकर म्हणाले, कवयित्रींची कविता म्हणजे स्वत:शीच असलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब आहे. व्यक्त व्हावेसे वाटणे ही खरी बंडखोरी आहे.
सुनील शिनखेडे यांनी, स्त्रियांचा माणूस होण्याची धडपड हाच खरा संघर्ष आहे. संत कवयित्रींनी तक्रारशून्य
जगून स्वत:ला सिद्ध केले. संतांनी या कवयित्रींना फार मोठा आश्रय दिल्याचे भाषणात नमूद केले.

Web Title: Rebellion is an integral part of life! Rangala seminar in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.