दोन मोठ्या सहकारी बँकांवर RBIची कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 04:54 PM2022-10-18T16:54:31+5:302022-10-18T16:55:36+5:30

RBI News: भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पुण्यातील राजगुरूनगर सहकारी बँक आणि गुजरातमधील को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोय यांचा समावेश आहे.

RBI crackdown on two big co-operative banks, including this bank in Maharashtra | दोन मोठ्या सहकारी बँकांवर RBIची कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश 

दोन मोठ्या सहकारी बँकांवर RBIची कठोर कारवाई, महाराष्ट्रातील या बँकेचा समावेश 

googlenewsNext

 नवी दिल्ली - महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये खाती असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये पुण्यातील राजगुरूनगर सहकारी बँक आणि गुजरातमधील को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोय यांचा समावेश आहे. राजगुरूनगर सहकारी बँकेला चार लाख रुपये आणि को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटला २ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेकडून या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार राजगुरू सहकारी बँकेला व्याजदर आणि डिपॉझिटसंबंधी केंद्रीय बँकेच्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी पकडण्यात आले आहे. तर को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ राजकोटने जागरुकता योजनेसंबंधी नियमांची अवहेलना करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय बँकेने हे पाऊल उचलले आहे.

आरपीआयने या बँकांची तपासण करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल समोर आल्यावर राजगुरूनगर सहकारी बँकेने मृत खातेधारकांच्या चालू खात्यामध्ये असलेली रक्कम त्यांच्या वारसांना सोपवली नव्हती. असा परिस्थिती वारसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. आरबीआयने बँकेला याआधी नोटिस पाठवली होती. मात्र लेखी जबाबाने आरबीआयचे समाधान झाले नाही, तसेच आरबीआयने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली.

आरबीआयने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा दंड बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ५६, कलम ४६(४) आणि कलम ४७ए(१)(सी) अंतर्गत दोषी आढळल्याने ठोठावण्यात आला आहे. मात्र याबाबत आरबीआयने सांगितले की, यातील कुठल्याही देवाणघेवाणीचा ग्राहकांवर काहीही परिणाम होणार नाही.  

Web Title: RBI crackdown on two big co-operative banks, including this bank in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.