राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:27 PM2018-12-05T12:27:56+5:302018-12-05T12:28:56+5:30

लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी विक्रोळी येथील सभेत केला होता.

Ram Mandir: Asaduddin Owaisi hits back to raj thackeray | राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी

राजकारणात जिवंत राहण्यासाठी राज ठाकरे माझं नाव घेताहेतः ओवैसी

Next
ठळक मुद्देराम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगली घडवण्याचा कट रचला जातोयः राज ठाकरेओवैसी बंधूंच्या मदतीने भाजपा कट रचत असल्याचा राज यांचा आरोपयूपी, बिहारच्या लोकांना मारणाऱ्या राज यांनी आत्मपरीक्षण करावंः ओवैसी

नवी दिल्लीः ओवैसी बंधूंना हाताशी धरून राम मंदिराच्या मुद्द्यावरून देशात दंगली घडवण्याचा कट भाजपा रचत आहे, असा आरोप करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांवर तुम्ही हल्ले का करताय? समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करण्याआधी जरा आत्मपरीक्षण करायला हवं. राजकारणात जिवंत राहण्यासाठी आमचं नाव घेत असाल, तर आमची हरकत नाही, असं असदुद्दीन ओवैसी यांनी राज ठाकरेंना सुनावलं.


लोकसभा निवडणुकीपूर्वी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन देशात दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा दावा राज यांनी विक्रोळी येथील सभेत केला होता. ओवैसी बंधूंच्या मदतीनं हा दंगली घडवण्याचा कट आखला जात असल्याचा दावा त्यांनी केला होता. दिल्लीतील एका व्यक्तीनं फोनवरून आपल्याला ही माहिती दिल्याचं ते म्हणाले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. 

शिवसेनेनं राज यांच्या दाव्याची खिल्ली उडवली आहे. 'दंगलीच्या कटाची माहिती असेल, तर पोलिसांना सांगा', असा टोला शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी काल लगावला. त्यानंतर आज ओवैसी यांनीही राज यांच्या आरोपांचा समाचार घेतला. 

Web Title: Ram Mandir: Asaduddin Owaisi hits back to raj thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.