रेल्वेमंत्र्यांच्या नावाची पाटी विरोधकांनी लाथाडली

By admin | Published: July 8, 2014 03:53 PM2014-07-08T15:53:41+5:302014-07-08T16:21:44+5:30

पहिलं रेल्वे बजेट सादर केलेल्या रेल्वेमंत्री सदानंद गौवडा यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली

The Railway Minister's name was spoiled by the opposition | रेल्वेमंत्र्यांच्या नावाची पाटी विरोधकांनी लाथाडली

रेल्वेमंत्र्यांच्या नावाची पाटी विरोधकांनी लाथाडली

Next

ऑनलाइन टीम मुंबई, दि. ८ - पहिलं रेल्वे बजेट सादर केलेल्या रेल्वेमंत्री सदानंद गौवडा यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली आणि त्यांच्या नावाची पाटी काढून ती खाली फेकली तसेच ती पायदळी तुडवली. रेल्वेचा अर्थसंकल्प जनतेची घोर निराशा करणारा असल्याचे तसेच रेल्वेचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सदानंद गौवडा यांची गाडीही कार्यकर्त्यांनी अडवली आणि त्यांचा निषेध केला. मोठ्या प्रमाणावर पोलिसांना पाचारण करण्यात आले असून आता स्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांचे हे कृत्य अशोभनीय असल्याची टीका भाजपाच्या नेत्यांनी केली आहे. रेल्वे बजेट अत्यंत वाईट असून अनेक राज्यांवर अन्याय करण्यात आल्याची भावना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी व्यक्त केली आहे. तसेच माजी रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपली नाराजी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवर त्यांनी मोदी सरकारने पश्चिम बंगालला वंचित ठेवून पश्चिम बंगालचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे.

Web Title: The Railway Minister's name was spoiled by the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.